महाबळेश्र्वरच्या समस्या तशाच आणि महोत्सवावर २० कोटी
सातारा : जागतिक पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरच्या महापर्यटन महोत्सव काही तासांवर येऊन ठेपला आहे. महाबळेश्वर पर्यटन महोत्सवासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद शासनाकडे प्रस्तावित आहे. पण महामहोत्सव असला तरी या परिसरातील अनेक समस्या कायम आहेत. त्यात वाढच होत आहे.
महापर्यटन महोत्सवाकरीता 20 कोटींची तरतूद पर्यटन संचालनालयाकडून होत असताना महाबळेश्वर महापर्यटनाचा नेमका उद्देश स्थानिकांच्या पर्यटनाला, व्यवसायाला चालना देण्याचा असताना स्थानिकांचा सहभाग या महापर्यटन महोत्सवात किती हा एक संशोधनाचा विषय आहे. महाबळेश्वर महापर्यटन राबवण्यात येत असताना महाबळेश्वरच्या पर्यटन हंगामात पर्यटकांना आकर्षित करुन घेतले जात आहे. असे असताना पर्यटन संचालनालयाकडून घेण्यात आलेले विविध कार्यक्रमात स्थानिकांना सामावून न घेता एका खाजगी कपंनीला महापर्यटन महोत्सवाचा ठेका दिला गेला आहे.
महाबळेश्वरच्या ऐतिहासिक पर्यटनाला याबाबत समोर ठेऊन घेण्यात आलेले विविध कार्यक्रम खाजगी कंपनीच्या माध्यमातून पार पाडले जाणार असल्याची चर्चा आहे. सातारा जिल्ह्यातील प्रशासन हे या महापर्यटन महोत्सवाच्या यशस्वी करण्याकरीता प्रयत्नाची पराकाष्टा करत असताना महाबळेश्वर शहरातील नागरीकांच्या मुलभुत रोजीरोटीचा निर्णय अद्याप प्रशासनाच्या बोटचेपी धोरणामुळे आजही भिजत घोगड होऊ पडला आहे.
त्यात 28 स्टॅालधारकांनी जलसमाधीचं दिलेलं अल्टिमेटम यावरुन लपून राहिले नाही. महाबळेश्वर शहरात जास्त भूखंडावर विविध प्रशासकीय विभागाचा मालकी हक्क आहे. स्थानिकांना आपल्या रोजीरोटीचा प्रश्न आजही सोडवता आला नाही, हे जळजळीत सत्य लपून राहिले नाही. पर्यटन संचालयानाकडून महापर्यटनाला भरघोस निधीची तरतुद मात्र स्थानिकांची आजही रोजीरोटीसाठी ससेहोलपट ही सुद्धा नाण्याची बाजू आहे.