Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Mayoral Election 2026: कोण होणार पुण्याचा महापौर? ‘या’ तीन नावांची चर्चा

नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने १६५ पैकी तब्बल ११९ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या पार्श्वभूमीवर महापौर व उपमहापौर निवडीबाबत पक्षात हालचालींना वेग आला आहे

  • By anuradha sagar
Updated On: Feb 03, 2026 | 09:57 AM
पीएमपीएमएलच्या ज्युनिअर क्लार्क भरतीला स्थगिती द्यावी; काँग्रेसची मागणी

पीएमपीएमएलच्या ज्युनिअर क्लार्क भरतीला स्थगिती द्यावी; काँग्रेसची मागणी

Follow Us
Follow Us:
  • पुण्याच्या महापौर कोण होणार याची उत्सुकता आज संपणार
  • पुणे महापालिकेच्या महापौर उपमहापौरपदासाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी निवडणूक
  • महापौर उपमहापौरपदावर भाजपचाच झेंडा फडकणार, हे जवळपास निश्चित
Pune Mayoral Election 2026: पुण्याचा महापौर कोण होणार याची उत्सुकता आज संपणार आहे. भाजपाकडून कोणत्या महिला नगरसेविकेला संधी दिली जाणार? काय फॉम्युला असणार? हे आज स्पष्ट होणार आहे. तसेच आरपीआयला भाजपकडून उपमहापौरपद दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पुणे महापालिकेच्या महापौर उपमहापौरपदासाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी निवडणूक होत असून, मंगळवारी (दि. ३) उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने महापौर उपमहापौरपदावर भाजपचाच झेंडा फडकणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे निवडणूक ही केवळ औपचारिकता ठरणार असून, खरा उत्सुकतेचा विषय आहे तो भाजप अनुभवी नगरसेवकांना संधी देणार, की पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत नव्या चेहऱ्याला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोठी बातमी ! TET परीक्षेचा अंतिम निकाल आज होणार जाहीर; राज्यातील तब्बल 4 लाख उमेदवारांचे लागले लक्ष…

नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने १६५ पैकी तब्बल ११९ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या पार्श्वभूमीवर महापौर व उपमहापौर निवडीबाबत पक्षात हालचालींना वेग आला आहे. महापौरपद हे सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव असल्याने अनेक नावे चर्चेत आहेत. चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या वर्षा तापकीर, रंजना टिळेकर यांच्यासह तिसऱ्यांदा निवडून आलेल्या मंजुषा नागपूरे, स्मिता वस्ते आणि मानसी देशपांडे यांची नावे आघाडीवर आहेत.

तसेच हडपसरमधून प्रतिनिधित्व करणाऱ्या उज्वला जंगले, मनीषा चोरबोले यांचाही विचार होऊ शकतो. याशिवाय प्रथमच महापालिकेत निवडून आलेल्या दिवंगत माजी मंत्री गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे. नाराजी दुर करण्यासाठी दहा महिने ! भाजपातील निवडुन आलेल्या नगरसेवकांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. तसेच वरीष्ठ नगरसेविका म्हणून चार ते पाच जणींची नावे आघाडीवर आहेत. यातून नाराजी निर्माण होऊ नये यासाठी पहिल्या अडीच वर्षांच्या कालावधीत तीन महिलांना प्रत्येकी दहा महिने महापौरपद देण्याचा ‘फॉर्म्युला’ ऐनवेळी लागू केला जाऊ शकतो, अशी माहिती भाजपच्या सूत्रांकडून मिळत आहे. दुसरीकडे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत.

Maharashtra Budget 2026 : झालं क्लिअर ! देवेंद्र फडणवीस मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

आरपीआयला संधी

मागील पंचवार्षिक सत्तेत भाजपने आरपीआयला उपमहापौर पद देऊ केले होते. यावेळी देखील निवडणुकीत भाजप आणि आरपीआयची युती होती. त्यामुळे यावेळीही उपमहापौरपद आरपीआयला दिले जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेस देणार उमेदवार

भाजपचा राज्यातील मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार की नाही, यावरून सोमवारी रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसकडून मात्र महापौर व उपमहापौर या दोन्ही पदांसाठी उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Web Title: Pune mayoral election 2026 these three names are being discussed for the post of mayor of pune municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • BJP Politics
  • Maharashtra Politics
  • PMC Election 2026

संबंधित बातम्या

Sambhajinagar News: ५ हजारांत दिवाळी कशी करायची? शेतकऱ्यांची चेष्टा थांबवून १ लाख द्या : रोहित पवारांची टिका
1

Sambhajinagar News: ५ हजारांत दिवाळी कशी करायची? शेतकऱ्यांची चेष्टा थांबवून १ लाख द्या : रोहित पवारांची टिका

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक
2

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा
3

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा

Maharashtra Live Breaking News in Marathi: रॅलीपूर्वी अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांची नोटीस
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: रॅलीपूर्वी अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांची नोटीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.