Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण

Pune Teachers Voter List : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीतील एका विचित्र नोंदीने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. प्रशांत बोंबले यांच्या नावाऐवजी यादीत 'बॉम्बस्फोट' असा शब्द आल्याचं समोर आलं असून रोहित पवारांनी हा प्रकार सोशल मीडियावरून समोर आणला.

  • By विवेक
Updated On: Oct 01, 2026 | 07:37 PM
Voter List

Voter List

Follow Us
Follow Us:
  • प्रशांत बोंबले यांच्या नावात ‘बॉम्बस्फोट’ शब्दाची विचित्र नोंद.
  • रोहित पवारांनी सोशल मीडियावरून प्रकार आणला प्रशासनाच्या निदर्शनास
  • चूक दुरुस्त करून 6 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार
 

सातारा : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत (Pune Teachers Voter List) अजब प्रकार घडला आहे. मतदार यादीत झालेल्या एका अजब नोंदीमुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. साताऱ्यातील वाई तालुक्यातील मतदार प्रशांत बोंबले यांच्या नावाऐवजी मतदार यादीत चक्क ‘प्रशांत दादासाहेबाची बॉम्बस्फोट’ अशी विचित्र नोंद झाल्याचं समोर आलं. या प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आलं.

प्रशांत बोंबले यांच्या वडिलांचं नाव दादासाहेब आहे. मात्र, मतदार यादीतील मराठी नोंदीमध्ये ‘दादासाहेब’नंतर थेट ‘बॉम्बस्फोट’ हा शब्द आल्याचं दिसून आलं. आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून ही बाब समोर आणत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.

मतदार यादी तयार करताना आणि अंतिम यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी अशा नोंदींची पडताळणी होते का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे मतदाराची ओळख आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कागदपत्रांमध्ये नाव अचूक असणं अत्यंत महत्त्वाचं असतं.

Abhijeet Dipke : ‘अमित शहांसारखी चूक तुम्ही करू नका,’ अभिजित दीपकेंचा फडणवीसांना इशारा; शिवाजी पार्क आंदोलनावर CJP आक्रमक

जिल्हाधीकाऱ्यांनी दिलं स्पष्टीकरण

दरम्यान, या प्रकरणावर सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मतदार यादी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रसिद्ध केली जाते. प्रशांत बोंबले यांचं नाव इंग्रजीमध्ये योग्य असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. मात्र, मराठी भाषांतर करताना सॉफ्टवेअरमधील तांत्रिक त्रुटी किंवा मानवी चुकीमुळे ही विचित्र नोंद झाली असावी, असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

प्रशासनाने संबंधित नोंद तातडीने दुरुस्त केली असून 6 ऑक्टोबर रोजी दुरुस्त केलेली अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या प्रकारासाठी जे अधिकारी किंवा कर्मचारी जबाबदार आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

मतदार यादी प्रक्रियेतील पडताळणी यंत्रणेवरही प्रश्न उपस्थित

या प्रकरणामुळे मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेतील पडताळणी यंत्रणेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. अंतिम यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी प्रत्येक नोंद बारकाईने तपासली जाते का, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

दरम्यान, प्रशांत बोंबले यांनी या प्रकरणावर माध्यमांशी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आहे. त्यांच्यावर कोणताही दबाव आहे का, याबाबत सध्या केवळ चर्चा आहे; त्याची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. त्यामुळे आता 6 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत प्रशांत बोंबले यांचं नाव अचूक पद्धतीने नोंदवलं जातं का, याकडे लक्ष लागलं आहे.

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

Web Title: Pune teachers voter list error prashant bomble rohit pawar satara vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 07:37 PM

Topics:  

  • pune news
  • rohit pawar
  • Satara
  • Voter List
  • Wai News

संबंधित बातम्या

पावसामुळे शाळांच्या परिसराती बसथांबा कोसळला, मनसे आक्रमक; महापालिका आयुक्तांकडे केली ‘ही’ मागणी
1

पावसामुळे शाळांच्या परिसराती बसथांबा कोसळला, मनसे आक्रमक; महापालिका आयुक्तांकडे केली ‘ही’ मागणी

Maharashtra Drought: दुष्काळाच्या यादीबाहेर असूनही पावसाचा दुष्काळ! पुण्यातील ५ तालुक्यांतील ४३ मंडळांत शेतीवर संकट
2

Maharashtra Drought: दुष्काळाच्या यादीबाहेर असूनही पावसाचा दुष्काळ! पुण्यातील ५ तालुक्यांतील ४३ मंडळांत शेतीवर संकट

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
3

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
4

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.