Pune ZP Election 2026: शिरूर तालुक्यात उमेदवारीवरून गोंधळ; पक्षाने उमेदवारी नाकारताच नेत्यांनी निवडली अपक्ष उमेदवारी (फोटो-सोशल मीडिया)
Pune ZP Election 2026: पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिरूर तालुक्यात अनेक घडामोडी घडत असताना नुकतेच राष्ट्रवादीचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यातच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्च्या उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेकांना पक्षाचा अधिकृत फॉर्म न मिळाल्याने मोठी उलथापालथ झाल्याचेही दिसून आले आहे. पुणे जिल्हा परिषदेसह शिरुर पंचायत समितीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असताना गेली दोन तीन वर्षांपासून वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणुकीची जय्यत तयारी करणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अनेक इच्छुकांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याचे दिसताच राष्ट्रवादीचे माजी आमदार पोपटराव गावडे, माजी सभापती सुनिता गावडे, माजी नगराध्यक्ष मनीषा गावडे, घोडगंगेचे माजी संचालक राजेंद्र गावडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
तसेच, शिक्रापूर सणसवाडी जिल्हा परिषद गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे व माजी पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे दोघी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या मात्र कुसुम मांढरे अपक्ष अर्ज दाखल करत परतल्या, तर तळेगाव ढमढेरे रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सारिका करपे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या मात्र सारिका करपे शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल करत परतल्या तर याच गटातून भारतीय जनता पार्टीकडून दिपाली गव्हाणे व रेश्मा शिंदे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या मात्र रेश्मा शिंदे अपक्ष अर्ज दाखल करत परतल्या.
हेही वाचा: महापालिका निवडणुकीत बनावट ओबीसींनी 52 जागा बळकावल्या; ओबीसी संघटनांचा आरोप
तसेच शिरुर न्हावरा गटातून तृप्ती सरोदे व वृषाली वाळके दोषी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या मात्र तृप्ती सरोदे शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल करत परतल्या तर अशी घडामोड असताना शिक्रापूर पंचायत समिती गणातून शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ सासवडे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले मात्र राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करुन परतले तर न्हावरा पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सागर खंडागळे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले मात्र भाजपाकडून अर्ज दाखल करुन परतले.
तसेच राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष राहुल रणदिवे हे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले मात्र शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल करुन परतले त्यामुळे शिरुर तालुक्यात आज वेगळीच चर्चा रंगली. मात्र, उमेदवारी अर्ज छानणी व अर्ज मागारी घेण्याच्या दिवशी काय काय व कशी घडामोड घडणार, कोणकोण उमेदवार रिंगणात असणार, निवडणूक पर्यंत काय घडामोड घडणार याकडे लक्ष लागले आहे.






