Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भीषण! PMP मध्ये मनुष्यबळाचा ‘दुष्काळ’; सुधारणा, बदल करायचा तरी कसा? वाचा सविस्तर

पीएमपीमध्ये एकूण तीन विभागांत कर्मचाऱ्यांची विभागणी करण्यात आलेली आहे.त्यात अॅडमिन (प्रशासन) विभागात लिपिक,सुरक्षा रक्षक,झाडूवाला,शिपाई अशा एकूण १०० प्रकारच्या पदांचा समावेश आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 25, 2026 | 07:08 PM
भीषण! PMP मध्ये मनुष्यबळाचा ‘दुष्काळ’; सुधारणा, बदल करायचा तरी कसा? वाचा सविस्तर
Follow Us
Follow Us:

पीएमपी आहे नागरिकांची जीवनवाहिनी
मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे संथ गती पीएमपीचा कारभार
पीएमपीमध्ये एकूण तीन विभागांत कर्मचाऱ्यांची विभागणी

चंद्रकांत कांबळे/पुणे: पुणे,पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए भागातील नागरिकांची जीवनवाहिनी असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) गाडा सध्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे संथ गतीने चालला आहे. सन २०१३ च्या आस्थापना आराखड्यानुसार पीएमपीमध्ये १५ हजार ५१९ पदांना मान्यता देण्यात आली होती .मात्र,सध्या (Pune) अवघ्या ७ हजार ४६८ कर्मचाऱ्यांच्या बळावर या जीवनवाहिनीचा रथ सुरू आहे.सद्यस्थितीत तब्बल ८ हजार ५१ पदे रिक्त आहेत. यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत असून,पीएमपीमध्ये नवीन काही बदल किंवा सुधारणा करायची म्हटल्यास मनुष्यबळाची मोठी अडचण येत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

पीएमपीमध्ये एकूण तीन विभागांत कर्मचाऱ्यांची विभागणी करण्यात आलेली आहे.त्यात अॅडमिन (प्रशासन) विभागात लिपिक,सुरक्षा रक्षक,झाडूवाला,शिपाई अशा एकूण १०० प्रकारच्या पदांचा समावेश आहे.वर्कशॉप (कार्यशाळा) विभागात क्लिनर,फोरमन,हेल्पर,इंजिनिअर यांचा समावेश असून,एकूण ४९ प्रकारची पदे आहेत.शिवाय वाहतूक विभाग यामध्ये वाहक,चालक,चेकर,डेपो मॅनेजर अशा ३८ प्रकारच्या पदांचा समावेश आहे.

PMPML News : ‘आपले पीएमपीएमएल’ ॲपला प्रवाशांचा प्रतिसाद; काही दिवसातच हजारो पुणेकरांनी डाऊनलोड केले ॲप

२०१३ च्या आस्थापना आराखड्यानुसार सद्यस्थिती

विभाग मान्यताप्राप्त जागा रिक्त जागा भरलेल्या जागा

अॅडमिन विभाग १,७९५ १,१३५ ६६०

वर्कशॉप विभाग २,९०२ २,१३३ ७६९

वाहतूक विभाग १०,८२२ ४,७८३ ६,०३९

एकूण संख्या १५,५१९ ८,०५१ ७,४६८

पीएमपीमध्ये शेवटची भरती कधी झाली?

पीएमपीमध्ये शेवटची भरती सन २०१७-१८ मध्ये वाहक,चालक,क्लिनर आणि वर्कशॉप विभागासाठी झाली होती.

भरती प्रक्रिया

पीएमपीची भरती प्रक्रिया अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करून सरळसेवेतून आणि अनुकंपा तत्त्वावर केली जाते.

Pune PMPML News : पुण्यात पीएमपीची बससेवा कोलमडली; दररोज ५४ बस ब्रेकडाऊन, प्रवाशांचे हाल

अनुकंपा प्रक्रिया आणि सद्यस्थिती

पीएमपीच्या अ,ब,क,ड यांपैकी कोणत्याही संवर्गातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचे सेवेत असताना निधन झाल्यास, त्यांच्या वारसांना ‘वाहक’ (कंडक्टर) या पदावर अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिली जाते. ५ फेब्रुवारी २०२१ ते ९ जून २०२६ या कालावधीत अनुकंपेसाठी एकूण १७७ अर्ज आलेले आहेत. यातील ९० जणांना नियुक्ती देण्यात आली असून, २८ जणांचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत.उर्वरित ५९ जणांपैकी २२ जण अपात्र ठरले आहेत, तर १९ जणांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही.तसेच १५ जणांचे वय १८ वर्षे पूर्ण नसल्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत आणि ३ जण सध्या वाहक म्हणून प्रशिक्षण घेत आहेत.

Web Title: 8 thousand 51 posts vacant in pmp department in pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • PMPML Bus
  • pune news
  • Pune PMP Bus

संबंधित बातम्या

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
1

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले
2

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प
3

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…
4

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.