PMPML News : 'आपले पीएमपीएमएल' ॲपला प्रवाशांचा प्रतिसाद; काही दिवसातच हजारो पुणेकरांनी डाऊनलोड केले ॲप (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पीएमपीएमएलच्या स्वतःच्या आणि ठेकेदारांच्या मिळून एकूण १ हजार ९६१ बसेसमध्ये हे स्कॅनर लावण्यात आले होते.२६ दिवसांत ॲप डाउनलोड करणाऱ्यांमध्ये ६० हजार अँड्रॉइड वापरकर्ते आणि १५ हजार ॲपलच्या वापरकर्त्यांचा समावेश आहे. सरासरी आकडेवारीनुसार, दररोज ९०० ते १००० अँड्रॉइड वापरकर्ते आणि ५०० ते ६०० ॲपल वापरकर्ते हे ॲप डाउनलोड करत आहेत.
आतापर्यंत ‘आपले पीएमपीएमएल’ ॲप वापरणाऱ्यांची एकूण संख्या साधारण ३० लाख इतकी झाली आहे. यामध्ये अँड्रॉइड मोबाईलचे २२ लाख ९० हजार, तर ॲपल मोबाईलचे ७ लाख वापरकर्ते आहेत.
पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड सांगतात स्कॅनर लावल्यापासून ७५ हजार प्रवाशांनी ‘आपले पीएमपीएमएल’ ॲप डाउनलोड केले आहे. दररोज सरासरी १ हजार ५०० प्रवासी हे ॲप डाऊनलोड करत आहेत. भविष्यात ५० लाख प्रवाशांपर्यंत हे ॲप पोहोचवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
हे देखील वाचा : ग्रामीण भागातील ज्येष्ठांना सवलत पाससाठी शहरी लाईट बिलची सक्ती; प्रवाशांचा संताप
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






