सौजन्य - नवराष्ट्र टीम
गेल्या अनेक दिवसांपासून अनिता इंगळे जोरदार प्रचार करत होत्या. अनिता इंगळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अनेक वर्षापासून काम करीत आहेत. पुण्यातील प्रभाग ३३ मध्ये त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. नागरिकांसाठी त्यांनी देवदर्शन यात्रेचे आयोजनही केले होते. गेल्या २ दिवसाखाली त्यांनी नवराष्ट्रशी संवाद साधला होता. विजयी होण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. १६ तारखेला तुतारी वाजणार, असंही त्या म्हणत होत्या. आता मिळालेल्या माहितीनुसार अनिता इंगळे विजयी झाल्या आहेत. प्रभाग ३३ (ब) मध्ये भाजपनेही जोरदार प्रचार केला होता. मात्र जनतेने इंगळे यांना निवडून दिले आहे.
हे सुद्धा वाचा : पूर्व पुण्यात सुरेंद्र पठारेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब; भाजपचे कमळ फुलले
कॉंग्रेसचे प्रशांत जगताप विजयी
पुण्यातील कॉंग्रेस उमेदवार प्रशांत जगताप यांचा विजय झाला आहे. पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक १८ (वानवडी – साळुंखेविहार) या प्रभागातून प्रशांत जगताप उमेदवार होते. त्यांनी विजयश्री खेचून आणत पुण्यात काँग्रेसचे खाते उघडले आहे. प्रशांत जगताप यांच्याविरोधात भाजपची कडवी लढाई होती. मात्र यानंतर देखील प्रशांत जगताप यांनी पूर्ण ताकदीने लढत दिल्याने त्यांचा विजय झाला आहे. काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेल्या शिवरकरांचा प्रशांत जगताप यांनी पराभव केला आहे. यामुळे पुण्यामध्ये आता पुन्हा एकदा प्रशांत जगताप यांची राजकीय ताकद दिसून आली आहे. पुण्यामध्ये प्रशांत जगताप यांची उमेदवारी देण्यावेळी मोठी चर्चा रंगली होती. प्रशांत जगताप हे पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये नाराज होते. शहराध्यक्ष नाराज असल्यामुळे शरद पवार गट अजित पवार गटासोबत असलेल्या युतीचा घाट मोडणार का? याची चर्चा रंगली होती. मात्र खासदार सुप्रिया सुळे यांनी निर्णय घेत नाराजी ही घरी असते पक्षामध्ये नाही असे म्हणत प्रशांत जगताप यांच्या नाराजीवर ताशेरे ओढले. यानंतर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत प्रशांत जगताप यांनी जोरदार प्रचार केला. प्रशांत जगताप यांचा आता विजय झाला आहे.






