Photo Credit- Social Media ( अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वडगावशेरी मतदारसंघावर भाजपचा दावा)
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी (20 ऑक्टोबर) आपल्या पहिल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर महायुतीतील शिंदे गट आणि आणि अजित पवार यांच्या गटाच्या उमेदवारांच्या याद्याही जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपच्या पहिल्या यादीत पुण्यातील तीन जागांवर उमेदवार निश्चित झाले.
महायुतीकडून अजूनहू पाच जागांवर उमेदवारी जाहीर झालेली नाही. पण वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाची जागा भाजप आपल्याकडे घेऊ शकतो, अशीही चर्चा सुरू आहे. त्यामुळेच आज वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. पुण्यातील आठपैकी सहा विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला तर इतर दोन मतदारसंघ अजित पवार गटाला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा:काँग्रेस-ठाकरे गटाचा वाद मिटला; शरद पवारांच्या मध्यस्थीच्या भूमिकेला यश
भाजपच्या वाटेल्या येणाऱ्या सहापैकी पर्वती, कोथरूड आणि शिवाजीनगर या तीन मतदारसंघामध्ये भाजपने उमेदवारांची घोषणा भाजपने केली आहे. तर कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघात अद्याप उमेदवारांची घोषणा कऱण्यात आलेली नाही. त्यातच वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात आपल्याला घेऊन अजित पवारांना खडकवासला मतदारसंघ देऊ शकतो अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
वडगावशेरी मतदारसंघात सुनील टिंगरेंना उमेदवारी दिल्यास विरोधी पक्षांकडून त्याचे भांडवल केले जाऊ शकते, त्यातच तीन महिन्यांपूर्वी अपघात प्रकरणावरून सुनील टिंगरे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. या सर्व कारणामुळे भाजप वडगावशेरी मतदारसंघ आपल्याकडे घेऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुनील टिंगरे यांनी तातडीने अजित पवारांची भेट घेतली आहे.
हेही वाचा:Pune Crime News: बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरण; पीडित मुलीला दिलासा
वडगावशेरीतून आपल्याला पुन्हा संधी मिळावी, यासाठी ते दादांच्या भेटीला गेल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आज किंवा उद्या जाहीर होणाऱ्या यादीत सुनील टिंगरे यांना उमेदवारी मिळणार की त्यांचा पत्ता कट होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.