Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाटण दुर्घटनेने महाराष्ट्र हादरला, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची घटनास्थळी भेट; मृतांच्या वारसांसाठी तब्बल…

मुसळधार पावसामुळे विसापूर किल्ला परिसरातील डोंगरकडा कोसळून नंदू दत्तू तिकोणे, त्यांच्या पत्नी अनिता तिकोणे आणि वर्षभरापूर्वीच विवाह झालेला त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर तिकोणे यांचा ढिगाऱ्याखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 12, 2026 | 04:45 PM
पाटण दुर्घटनेने महाराष्ट्र हादरला, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची घटनास्थळी भेट; मृतांच्या वारसांसाठी तब्बल...

पाटण दुर्घटनेने महाराष्ट्र हादरला, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची घटनास्थळी भेट; मृतांच्या वारसांसाठी तब्बल...

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील पाटण गावावर शनिवारी पहाटे दुर्दैवाचा डोंगर कोसळला. मुसळधार पावसामुळे विसापूर किल्ला परिसरातील डोंगरकडा कोसळून नंदू दत्तू तिकोणे, त्यांच्या पत्नी अनिता तिकोणे आणि वर्षभरापूर्वीच विवाह झालेला त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर तिकोणे यांचा ढिगाऱ्याखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक दुर्घटनेमुळे संपूर्ण मावळ तालुक्यावर शोककळा पसरली. या भीषण घटनेची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पाटण गावाला भेट देत दुर्घटनास्थळाची पाहणी केली.

 

सुनेत्रा पवार यांनी बाधित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले तसेच मयत ज्ञानेश्वर तिकोणे यांच्या गरोदर पत्नीला धीर देत शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांप्रमाणे एकूण १२ लाखांची आर्थिक मदत तातडीने मंजूर करून संबंधित रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच दुर्घटनेत पूर्णपणे जमीनदोस्त झालेल्या घरासाठी १ लाख २० हजारांची शासकीय मदत त्वरित देण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

हे सुद्धा वाचा : वारी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ, कडेकोट बंदोबस्तातही 11 साखळी चोरी; हडपसरमध्येच 9 घटना

यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, प्रशासनातील अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दुर्घटनेने पावसाळ्यात डोंगरपायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा संवेदनशील भागातील कुटुंबांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि पुनर्वसनाची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

हे सुद्धा वाचा : प्रताप सरनाईक यांचा स्तुत्य उपक्रम! वारकऱ्यांसाठी स्वखर्चातून सुरू केली ‘मोफत मोबाईल चार्जिंग’ सुविधा

दरम्यान, दुर्घटनेनंतर महसूल, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, आरोग्य विभाग तसेच स्थानिक स्वयंसेवकांनी तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू केले. ढिगारा हटविण्यासाठी यंत्रसामग्रीची मदत घेण्यात आली, तर परिसरातील इतर घरांचीही पाहणी करून संभाव्य धोक्याचा आढावा घेण्यात आला. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने डोंगरपायथ्यावरील आणि भूस्खलनाचा धोका असलेल्या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भूगर्भतज्ज्ञांकडून पाहणी करून धोकादायक क्षेत्रे निश्चित करावीत, तसेच आवश्यक त्या ठिकाणी संरक्षणात्मक उपाययोजना व सुरक्षित पुनर्वसनाचा आराखडा तातडीने राबवावा, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी केली आहे.

Web Title: Deputy chief minister sunetra pawar has met the families of the deceased in the patan tragedy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • Sunetra Pawar
  • Sunil Shelke
  • Vadgaon Maval

संबंधित बातम्या

दोम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पार पडणार हाय वोल्टेज मिटिंग!
1

दोम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पार पडणार हाय वोल्टेज मिटिंग!

Wardha News : सिंचनासाठी २४ तास वीजपुरवठ्याची मागणी, माजी आमदार तिमांडे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना साकडे
2

Wardha News : सिंचनासाठी २४ तास वीजपुरवठ्याची मागणी, माजी आमदार तिमांडे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना साकडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.