रश्मी शुक्लांची विजयस्तंभासह वढू बुद्रुकला भेट
एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची तयारी पूर्ण होत आली आहे . दरम्यान सदर कार्यकम स्थळी भेट देत प्रशासनाने केलेल्या नियोजनाची पाहणी करत राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आढावा घेतला आहे. तसेच वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीस्थळी भेट देखील दिली.
कोरेगाव भीमा ता. शिरुर सह पेरणे येथील ऐतिहासिक विजयस्तंभ तसेच वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीस्थळी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी भेट दिली,. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलीस हवालदार संदीप कारंडे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस हवालदार अनिल जगताप कोरेगाव भीमा विजयस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, भूषण गायकवाड, युवराज बनसोडे, विवेक बनसोडे, पांडुरंग गायकवाड यांसह आदी उपस्थित होते.
दरम्यान राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी विजयस्तंभ तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीची पाहणी करत येथे समाज बांधवांना देण्यात येणाऱ्या सुविधा, नियोजन तसेच पार्किंग आणि पोलीस बंदोबस्तची माहिती घेतली. दरम्यान पोलीस प्रशासनाला योग्य सूचना देखील राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दिल्या आहे.
कोरेगाव भीमात पोलिसांचे सशस्त्र संचलन
कोरेगाव भीमा ता. शिरूर परिसरात एक जानेवारी २०१८ ला झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या एक जानेवारी विजयस्तंभ अभिवादन दिनाच्या कार्यक्रमासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी परिसरात मोठा फौजफाटा लावला असून शुक्रवारी (दि.२७) कोरेगाव भिमातील पुणे नगर महामार्गावरुन पोलिसांनी सशस्त्र संचलन करत परिसरात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
कोरेगाव भीमा ता. शिरूर व सणसवाडी परिसरात एक व दोन जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमिवर प्रत्येक वर्षी पोलीस प्रशासन परिसरात शांतता राखण्यासाठी संचलन करत असतात. या वर्षी कोरेगाव भीमा परिसरातील गावांमधुन सामाजीक सलोखा जपण्यासाठी गावातील प्रत्येक चौकात, वस्तीवर एक पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे, तर शिक्रापूर पोलिसांच्या वतीने प्रत्येक गावोगाव पोलिस संचलन सुरु करण्यात आले असून पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या सुचनेनुसार नुकतेच घेण्यात आलेल्या या संचलनामध्ये उविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप साळुंके, पोलिस उपनिरीक्षक पोलिस उपनिरीक्षक विजय म्हस्कर, सोमनाथ कचरे, सचिन खलोले, मल्हारी वणवे, संदीप कारंडे, श्रावण गुपचे, महेंद्र पाटील राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांमधील जवान सहभागी झाले होते, तर पोलिसांनी केलेल्या या संचलनामुळे ग्रामस्थ व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.