पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई (फोटो- istockphoto)
उन्हाळ्यापूर्वी पाण्यासाठीची कोणतीच तजवीज नसल्याने पाणीटंचाईचे सावट भीषण होण्याची शक्यता आहे. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विभागातील गावांत यंदाही भीषण पाणीटंचाई आहे. गावातील तलाव पूर्ण कोरडे पडल्याने गावाशेजारील विहिरीतून महिलांना पाणी आणावे लागत आहे. टँकरद्वारे विहिरीत पाणी सोडले जाते आणि मग ते पाणी महिला भरतात. ही परिस्थिती अनेक ठिकाणी पाहण्यास मिळत आहे.
Pune Water News: उन्हाळा वाढला! पुण्यात पाण्याची मागणी वाढली; मात्र ‘या’ कारणामुळे नागरिक त्रासले
जलवाहिन्यांचे नकाशे नाहीत उपलब्ध
शहराच्या कानाकोफऱ्यात पाणीपुरवठा विभागाने जलवाहिन्यांचे जाळे निर्माण केले आहे. अनेक जलवाहिन्यांद्वारे पाणी येण्यास अडथळा येत आहे. तसेच जलवाहिन्याअसून देखिल पाणी येत नाही. जलवाहिन्यांचे कनेक्शन तसेच वॉल दुरुस्ती केली जाते. परंतु शहरातील जलवाहिन्यांचे नकाशेच पाणीपुरवठा विभागाकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे पाण्याची समस्या सोडविण्यास वेळ लागत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.