Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवकाळी पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील शेतकरी हवालदिल; दिलीप वळसे पाटलांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

आंबेगाव तालुक्यात पुन्हा गुरुवारी आलेल्या अवकाळी पावसाने शेतातील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. कांदा काढणी सुरू असताना पाऊस आल्याने शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 03, 2026 | 02:03 PM
अवकाळी पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील शेतकरी हवालदिल; दिलीप वळसे पाटलांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

अवकाळी पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील शेतकरी हवालदिल; दिलीप वळसे पाटलांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

Follow Us
Follow Us:

पारगाव शिंगवे : आंबेगाव तालुक्यात पुन्हा गुरुवारी आलेल्या अवकाळी पावसाने शेतातील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. कांदा काढणी सुरू असताना पाऊस आल्याने शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. शेतात काढून ठेवलेला कांदा पावसाने भिजून जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवला होता. तसेच शेतातील गव्हाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

बुधवारी (दि. १) वादळी वाऱ्यासह गारपीठ झाली होती. देवगाव, लाखणगाव, पोंदेवाडी, खडकवाडी, लोणी, वाळुंजनगर या परिसरात मोठे नुकसान झाले आहे. तसेच जनावरांचा हिरवा चारा तसेच मका, आंबा, पालेभाज्या, कलिंगड, फुल बागांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे कोंलमडली होती. तसेच पोंदेवाडी विजेचे खांबही पडलेले होते. देवगाव येथील पांडुरंग नथू कोकणे यांच्या घराचे पत्रे वादळी वाऱ्याने उडाले होते. घरातील संसार उपयोगी वस्तू तसेच धान्य पावसाने भिजून गेले आहे.

वळसे पाटील यांनी केली पिकांची पाहणी

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बुधवारी अवकाळी पाऊस व गारपीठीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या भागांची माजी मंत्री, आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देत नुकसानाचा अहवाल लवकरात लवकर जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले.

हे सुद्धा वाचा : खेडच्या पश्चिम पट्ट्यात अवकाळीचा हाहाकार, चिखलगाव परिसरात पिके जमीनदोस्त; शेतकऱ्यांकडून तातडीने पंचनाम्यांची मागणी

पाहणी दौऱ्यात अधिकाऱ्यांची उपस्थिती

या पाहणी दौऱ्यात प्रभारी तहसीलदार सचिन वाघ, तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे ,बाजार समितीचे सभापती निलेश थोरात, उपसभापती सचिन पानसरे, पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज, रवींद्र करंजखेले, अनिल वाळुंज, शिरीष रोडे , सतीश रोडे, निलेश पडवळ, मनोज रोडे ,बाबाजी गावडे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भोर तालुक्यात कुटुंबे उघड्यावर

भोर शहरासह ग्रामीण भागात सोमवारी झालेल्या अवकाळी गारपीठ आणि वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे. अनेक घरांचे छप्पर उडाल्याने सामान्य नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. निसर्गाच्या या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. भर पावसात आणि गारपिठीने काढणीला आलेल्या गहू, कांदा, ज्वारी, यासारख्या रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आंबा बागांनाही या अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बागायतदार शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतीच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितांची जुळवाजुळव कोलमडली आहे. तर जनावरांसाठी साठवलेला चारा भिजल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Farmers in ambegaon taluka have suffered huge losses due to unseasonal rains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • Ambegaon taluka
  • CM Devedra Fadnavis
  • Dilip Walase Patil
  • Farmers

संबंधित बातम्या

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
1

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र
2

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
3

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
4

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.