कपडे चोरणारी महिला अटकेत (फोटो- istockphoto)
टेम्पोतून कपडे चोरणाऱ्या महिलेला अटक
सीसीटीव्ही चित्रीकरणावरुन काढला महिलेचा माग
टेम्पो चालकाने दिली येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार
पुणे: रस्त्याच्या कडेला लावलेल्या टेम्पोतून कपडे चोरणाऱ्या महिलेला येरवडा पोलिसांनी अटक केली. कपडे चोरून पसार झालेल्या महिलेचा सीसीटीव्ही चित्रीकरणावरुन माग काढण्यात आला. नंदा विकास काळे (वय ४५, रा. पाण्याच्या टाकीजवळ, चंद्रमानगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत एका टेम्पो चालकाने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदार टेम्पो चालक हे ऑनलाइन पद्धतीने विक्री करणाऱ्या विविध वस्तूंची वाहतूक करतात. महागडे कपडे पोहोचविण्याचे काम टेम्पो चालाकाकडे सोपविण्यात आले होते. १८ नोव्हेंबर रोजी चालकाने टेम्पो येरवड्यातील प्रतीकनगर परिसरात लावला. टेम्पोत महागड्या कपड्यांचे पार्सल ठेवण्यात आले होते. काळे हिने टेम्पोत ठेवलेले कपड्यांचे पार्सल लांबविले.
पोलिस उपनिरीक्षक महेश फटांगरे आणि शैलेश वाबळे यांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तेव्हा चित्रीकरणात कपडे चोरणारी महिला आढळून आली. महिला परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन काळे हिला ताब्यात घेतले. वरिष्ठ निरीक्षक अंजुम बागवान, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
फॉर्च्युनरमध्ये बसवून मित्राला गोळ्या घातलेल्या आरोपींना अटक
पिंपरी चिंचवड परिसरात वडमुखवाडी या परिसरात जमिनीच्या वादातून १२ नोव्हेंबरला नितीन गिलबिले याची हत्या करण्यात आली होती. दोन मित्रांनी नितीनला गाडीत बसवलं आणि त्या नंतर जवळून डोक्यात गोळी घातली आणि मृतदेह तसंच फेकून दिला. हत्या केल्यानंतर तीन आरोपी फरार झाले होते. त्यातील एकाला वाघोलीमधून अटक करण्यात आली होती. मात्र दोन आरोपी फरार होते. त्या आरोपींचा ताम्हिणी घाटात वावर असल्याचं समोर आल. एक विना क्रमांक असलेली गाडी उभी होती. ही गाडी हत्येमध्ये वापरण्यात आली होती. या प्रकरणात विक्रांत ठाकूर आणि सुमित पटेल यांना पोलिसांनी ताब्यात घेतल आणि एका अमित पठारे याला अटक करण्यात आली होती.
Pune Crime: फॉर्च्युनरमध्ये बसवून मित्राला गोळ्या घातलेल्या आरोपीना अटक! ताम्हिणी घाटात घडला थरार
या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी यांनी चौकशीत या माजी नगरसेवकाचे नाव घेतला आहे. त्याच्या शोधासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आली आहेत. अजूनही किसन तापकीर याचा शोध लागलेला नाही. पोलीसांकडून याचा तपास केला जात आहे. खुनाच नेमक कारण समोर आलेल नाही. मात्र अजूनही पोलिसांमार्फत याचा सखोल तपास केला जात आहे. हत्येचं कारण अद्याप कळू शकल नाही. जमिनीच्या आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय आहे.






