ट्रम्प यांनी विशेषतः “तिसऱ्या जगातील देशांमधून होणारे स्थलांतर” थांबवण्यावर भर दिला आहे. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Trump immigration pause 2025 : वॉशिंग्टन डी.सी.मधील अलीकडील गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण अमेरिका (America) हादरली असताना आता या घटनेमुळे अमेरिकन इमिग्रेशन धोरणांमध्ये मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी या घटनेनंतर तत्काळ प्रतिक्रिया देत एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कठोर घोषणा केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, त्यांचे प्रशासन “तिसऱ्या जगातील देशांमधून होणारे स्थलांतर कायमचे थांबवण्यासाठी” पूर्ण ताकदीने काम करणार आहे.
शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) एका सोशल मीडिया पोस्टद्वारे ट्रम्प यांनी या निर्णयाची माहिती दिली. ट्रुथआउटवर लिहिताना त्यांनी सांगितले की, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जग वेगाने बदलत असले तरी अमेरिकेची इमिग्रेशन पॉलिसी अनेक वर्षांपासून अमेरिकन जनतेच्या हिताला बाधा आणत आहे. त्यांच्या मते, बेपर्वा इमिग्रेशन ही समस्या फक्त आर्थिकच नाही तर सांस्कृतिक आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही एक मोठे आव्हान बनली आहे.
ट्रम्प म्हणाले की, “मी सर्व तृतीय जगातील देशांमधून होणारे स्थलांतर कायमचे थांबवीन, कारण त्यामुळे अमेरिकन व्यवस्था पुन्हा उभी राहू शकेल आणि सुरक्षित भविष्य निर्माण करता येईल.” त्यांनी पुढे म्हटले की, बायडेन प्रशासनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर स्थलांतरित देशात आले असून यामुळे देशाच्या संसाधनांवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Radar Proof : युद्धाच्या पार्शवभूमीवर ड्रॅगनचा आश्चर्यकारक दावा; लुफा तंत्रज्ञानामुळे गुप्तचर विमान होऊ शकते पूर्णपणे ‘अदृश्य’
या घोषणेनंतर सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे ट्रम्प यांची डिपोर्टेशन बाबतची भूमिका. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, “जो कोणी अमेरिकेसाठी निव्वळ मालमत्ता नाही किंवा ज्याला आपल्या देशाबद्दल निष्ठा नाही, त्याला मी हद्दपार करेन.” त्यांनी यासोबतच गैर-नागरिकांसाठी दिले जाणारे सर्व संघीय फायदे, वित्तीय सहाय्य आणि अनुदानेही काढून टाकण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या मते, अमेरिकेच्या करदात्यांवर अनावश्यक ओझे टाकणाऱ्या परदेशी नागरिकांना देशात ठेवण्याचे कोणतेही कारण नाही.
“I will permanently pause migration from all Third World Countries…”says US President Donald Trump after shoot out near White House, in which the accused was an Afghan, who served the Americans during occupation of the country. pic.twitter.com/RcuimIBeDT — Sidhant Sibal (@sidhant) November 28, 2025
credit : social media
या निर्णयामुळे आगामी दिवसांत अमेरिकेची इमिग्रेशन पॉलिसी जगभरात चर्चेचा विषय ठरेल यात शंका नाही. विविध तज्ञांच्या मते, ट्रम्प यांच्या घोषणेचा प्रभाव फक्त अमेरिका-तिसऱ्या जगातील देशांपर्यंत मर्यादित राहणार नाही, तर जागतिक स्थलांतर व्यवस्थेलाही याचा मोठा परिणाम भोगावा लागेल. विशेषत: दक्षिण आशिया, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेतून अमेरिकेत जाण्याची इच्छा बाळगणाऱ्या लाखो लोकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hong Kong Fire : 70 वर्षातील सर्वात मोठी आपत्ती; 4,600 लोकांची घरे उद्ध्वस्त, हाँगकाँग आगीत 94 जणांच्या मृत्यूंना जबाबदार कोण?
ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये असेही म्हटले की, अमेरिकन हिताचे रक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक आहे आणि त्यासाठी ते कोणत्याही कठोर पावलांची मागेपुढे न पाहता अमलबजावणी करतील. वॉशिंग्टनमधील गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या विधानांना अधिक तीव्र प्रतिसाद मिळत असून देशातील राजकीय वातावरणही चांगलेच तापत आहे.
Ans: वॉशिंग्टन डी.सी.तील गोळीबारानंतर राष्ट्रीय सुरक्षा व सामाजिक स्थैर्याचे कारण देत त्यांनी हा निर्णय घेतला.
Ans: ट्रम्प यांनी विशेषतः तिसऱ्या जगातील देशांमधून होणारे स्थलांतर थांबवण्यावर भर दिला आहे.
Ans: होय. ज्यांना ते अमेरिकेचे ‘निव्वळ मालमत्ता’ मानत नाहीत किंवा ज्यांच्याकडे निष्ठा नाही, त्यांना हद्दपार करण्यात येईल.






