सौजन्य - नवराष्ट्र टीम
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळून भीषण दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. रविवार सुट्टी असल्याने या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होती. पुल कोसळून 25 ते 30 पर्यटक बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटकांची संख्या पूलावर जास्त होती त्यामुळे ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे अद्याप कुंड मळ्यात किती पर्यटक बुडाले आहेत. याबाबत अद्याप आकडा स्पष्ट होऊ शकला नाही. २५ ते ३० जण बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि अग्निशमन दल, मावळ वन्यजीव रक्षक यांची टीम पोहचली आहे. बचावकार्य सुरू आहे. आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यंत्रणांकडून बचाव कार्य सुरू आहे.
कुंडमळा हे ठिकाण पर्यटनस्थळ असून हे ठिकाण धोकादायक असल्याचं सांगितलं जातय. पावसाळ्यात, विशेषतः शनिवार आणि रविवारी या ठिकाणी पर्यंटक मोठी गर्दी करतात. या ठिकाणी नदीवर जुना पूल आहे. त्याचीही डागडूजी करण्यात आली नाही. असं असलं तरी प्रशासनाने त्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याचं दिसून येतंय. त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.