Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jay Pawar: “विमान अपघाताच्या अखेरच्या क्षणीही दादांच्या…”; जय पवारांनी जागवल्या अजितदादांच्या हृदयस्पर्शी आठवणी

बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचारात जय पवार यांनी वडील अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. विमान अपघाताच्या वेळीही दादांच्या हातात कामाच्या फाईल्स होत्या, हे सांगताना ग्रामस्थ भावूक झाले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 18, 2026 | 08:16 PM
जय पवारांनी जागवल्या अजितदादांच्या हृदयस्पर्शी आठवणी

जय पवारांनी जागवल्या अजितदादांच्या हृदयस्पर्शी आठवणी

Follow Us
Follow Us:

 

  • “विमान अपघाताच्या अखेरच्या क्षणीही दादांच्या…”
  • जय पवारांनी जागवल्या अजितदादांच्या हृदयस्पर्शी आठवणी
  • जाणून घ्या काय म्हणाले…
बारामती/प्रतिनिधी:  ज्यावेळी दादांच्या विमानाचा अपघात झाला, त्यावेळी अखेरच्या क्षणी देखील त्यांच्या हातात बारामतीकरांच्या कामाची कागदपत्रे होती, रात्रंदिवस बारामतीच्या विकासाचा ध्यास त्यांच्या मनात होता, बारामतीच्या विकासाचा वेग पुढे कायम ठेवण्यासाठी, बारामती करांची कायम साथ आवश्यक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी बोलताना सांगितले. वडील दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हृदयस्पर्शी आठवणीने उपस्थित ग्रामस्थ देखील भावुक झाले.

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ जय पवार यांनी बारामती तालुक्यातील विविध गावांमध्ये गाव भेट दौरा सुरू केला आहे. यावेळी आयोजित दौऱ्यामध्ये त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. जय पवार म्हणाले, अजित दादा कधीच थांबले नाहीत.२८ जानेवारी रोजी अपघात झाला, त्या दवशी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी चार प्रचार सभा ते घेणार होते. अपघाता वेळी कामांचीच यादी त्यांच्या हातात होती. स्वतःला बारामतीसाठी पूर्णपणे त्यांनी झोकून दिले होते. माझं लग्न झाल्यामुळे मी पुण्यात घर घेतलं होतं. दि २४ जानेवारी रोजी दिवसभर अजितदादा बारामतीत असल्याने मी त्यांना फोन करून त्यांची वेळ मागितली. त्यांनी मला २६ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता मला पुण्यातील घरी भेटण्यास सांगितले. मात्र कोणत्याही परिस्थितीत थोडा देखील उशीर करू नको, अशी सूचना देखील त्यांनी त्यावेळी केली. मी त्या दिवशी अगोदरच त्या ठिकाणी पोचलो, त्या दवशी ते खूप आनंदी होते.

मी कधीही त्यांच्याबरोबर शासकीय कार्यक्रमाला जाण्याचा आग्रह धरला नव्हता, मात्र त्यादिवशी झेंडावंदन साठी मी येऊ का असा प्रश्न केला होता, सुरुवातीला त्यांनी नकार दिला मात्र नंतर त्यांनी होकार देऊन पुढच्या रांगेत बसण्याची सूचना देखील केली. कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा पुण्यातील जिजाई बंगल्यावर ते आले. दुपारपासून त्यांच्या बैठका सुरू झाल्या. सायंकाळी पुन्हा मी त्यांना भेटलो, त्यादिवशी मला त्यांच्याबरोबर सहवासात राहण्याची खूप इच्छा झाली होती, मन कोणास ठाऊक का अस्वस्थ होत होतं, त्यामुळेच मी त्यांना भेटल्यानंतर दादा आता जरा आराम करा!, फार धावपळ करू नका, अशी विनंती त्यांना केली. त्यावेळी त्यांनी ही निवडणूक संपल्यानंतर पुढे निवडणुका नाहीत, त्यामुळे आपण पाच जण बाहेर नक्की फिरायला जाऊ, असे अभिवचन त्यांनी दिले होते, ही आठवण सांगत असताना जय पवार भावूक झाले. वडिलांची हृदयस्पर्शी आठवण जय पवार उपस्थितांना सांगत असताना उपस्थित ग्रामस्थ देखील भावुक झाले.

Parth Pawar Oath Ceremony : हळवा क्षण! अजित दादाचं जॅकेट अन् आईची उपस्थिती…, पार्थ पवार यांनी घेतली राज्यसभा सदस्यपदाची शपथ

बारामतीच्या विकासाची गती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली कधीही कमी होऊ दिली जाणार नाही. अजितदादांच्या स्वप्नातील बारामती करण्याचा आमचा कायम प्रयत्न राहील. या निवडणुकीमध्ये विक्रमी मताधिक्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवडून द्या, प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका कायम राहील असा विश्वास जय पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. दरम्यान विविध गावांमध्ये ग्रामस्थांशी संवाद साधत असताना, त्यांनी अनेकांशी परिचय करून घेतला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ प्रचार दौऱ्यात

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर, माळेगाव या ठिकाणी प्रचार दौऱ्यामध्ये सहभाग घेऊन बैठकांमध्ये उपस्थिती दर्शवली. माजी क्रीडामंत्री संजय बनसोडे हे देखील गेल्या अनेक दिवसांपासून बारामती मध्ये प्रचारासाठी आयोजित बैठका घेत आहेत. जिल्हा सह राज्यातील विविध भागातून राष्ट्रवादीचे अनेक नेते व पदाधिकारी उत्स्फूर्तपणे बारामती मध्ये येऊन आपली उपस्थिती दर्शवत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देत आहेत.

Baramati Politics: ‘आत्या म्हणून जे सांगायचे ते घरात सांगेन!’ पार्थ पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

Web Title: Jay pawar revives heartwarming memories of ajit dada

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 08:16 PM

Topics:  

  • ajit pawar news
  • ajit pawar plane crash
  • baramati
  • Jay Pawar

संबंधित बातम्या

Baramati Suicide : बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ
1

Baramati Suicide : बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ

Sunetra Pawar on Supriya Sule : ‘अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण करू नका,’ सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला
2

Sunetra Pawar on Supriya Sule : ‘अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण करू नका,’ सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.