Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune MPSC Student Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जयंत पाटलांचा पाठिंबा; ‘विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नाही’

Pune MPSC Student Protest : MPSC पेपरफुटी आणि परीक्षेतील कथित गैरप्रकारांविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा निघाला. या आंदोलनाला जयंत पाटील यांनी पाठिंबा दिला असून रोहित पवार यांनी गाडीवर चढून सरकार आणि MPSC प्रशासनावर जोरदार टीका केली.

  • By विवेक
Updated On: Sep 07, 2026 | 05:27 PM
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जयंत पाटलांचा पाठिंबा

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जयंत पाटलांचा पाठिंबा

Follow Us
Follow Us:
  • MPSC पेपरफुटीविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा विराट मोर्चा
  • जयंत पाटील यांनी आंदोलनाला जाहीर केला पाठिंबा
  • रोहित पवारांची अध्यक्ष आणि सचिव बदलण्याची मागणी
 

Pune MPSC Student Protest : MPSC पेपरफुटी आणि परीक्षेतील कथित गैरप्रकारांच्या मुद्द्यावरून पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश चांगलाच उफाळून आला आहे. शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून MPSC विद्यार्थी आणि शिक्षकांच्या वतीने विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाला आता राजकीय पाठिंबाही मिळू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

जयंत पाटील यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपली भूमिका मांडली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारी पेपरफुटी किंवा परीक्षेतील गैरप्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेता कामा नयेत, असं त्यांनी म्हटलं.

नेमकं काय म्हणाले जयंत पाटील ?

आपल्या ‘X ‘ अकाऊंटवरून पोस्ट करत जयंत पाटील म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारी MPSC पेपरफुटी आणि परीक्षेतील गैरप्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाऊ नयेत. MPSC विद्यार्थी आणि शिक्षकांच्या वतीने आज विराट आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आवाज बुलंद करण्यात आला आहे. हा महाराष्ट्रातील लाखो मेहनती, प्रामाणिक आणि स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे.”

Rahul Gandhi News: विद्यार्थी भाजपवर नाराज; महाराष्ट्रातील परीक्षा आंदोलनावर राहुल गांधींचा इशारा

ते पुढे म्हणाले, “आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक अडचणींचा सामना करत दिवस-रात्र अभ्यास करून गरीब विद्यार्थी परीक्षा देतात. अशा परिस्थितीत पेपरफुटी, गैरप्रकार किंवा परीक्षेतील कोणतीही अनियमितता घडल्यास त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाते. मेहनत करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळालाच पाहिजे. परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांना कठोरपणे आळा घालून पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था निर्माण करणे ही सरकारची जबाबदारी आहे.”

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारी MPSC पेपरफुटी आणि परीक्षेतील गैरप्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाऊ नयेत. MPSC विद्यार्थी आणि शिक्षकांच्या वतीने आज विराट आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आवाज बुलंद करण्यात आला आहे. हा महाराष्ट्रातील लाखो… pic.twitter.com/bs3ornO5qn — Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 7, 2026

“विद्यार्थ्यांच्या मनातील असंतोष समजून घेऊन त्यांच्या मागण्यांवर तातडीने आणि सकारात्मक निर्णय घ्या. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यात आल्या पाहिजेत. MPSC विद्यार्थ्यांच्या या न्याय्य आणि हक्काच्या लढ्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नाही!” असे ते यावेळी म्हणाले.

रोहित पवारही आंदोलनात सहभागी

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही या आंदोलनात सहभागी होत सरकार आणि MPSC प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. सरकार आणि आयोगाचा निषेध करण्यासाठी आपण काळा शर्ट घातल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी ते चक्क गाडीवर चढले आणि उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केलं.

“पैसे खाण्याच्या नादात गरीब मुलांचं नुकसान होत आहे,” असा आरोप करत रोहित पवार यांनी MPSC चे अध्यक्ष आणि सचिव बदलण्याची मागणी केली. आयोगावर स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी असायला हवेत, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’

‘ही आणलेली गर्दी नाही’

रोहित पवार यांनी आंदोलनातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरही भाष्य केलं. हा विद्यार्थ्यांनी स्वतःहून काढलेला मोर्चा आहे, ही आणलेली गर्दी नाही, असा दावा त्यांनी केला. दिवसाचे अनेक तास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना भ्रष्टाचार आणि गैरप्रकार मान्य नसल्याचं त्यांनी सांगितलं.

परीक्षेतील पारदर्शकता, निष्पक्षता आणि विश्वासार्हता टिकवणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं जयंत पाटील यांनीही म्हटलं आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यासोबतच भविष्यात पेपरफुटीसारख्या घटना होणार नाहीत, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.

दरम्यान, MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे पुण्यातील वातावरण तापलं असून आता सरकार या मागण्यांवर काय निर्णय घेतं, याकडे विद्यार्थ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Jayant patil support pune mpsc student protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 05:27 PM

Topics:  

  • jayant patil
  • MPSC
  • MPSC Paper Leak
  • pune news
  • rohit pawar
  • Student Protest

संबंधित बातम्या

Pune MPSC Student Protest : ‘जनाची नाही, मनाची तरी असेल तर ..,’रोहिणी खडसेंचा सरकारवर हल्लाबोल
1

Pune MPSC Student Protest : ‘जनाची नाही, मनाची तरी असेल तर ..,’रोहिणी खडसेंचा सरकारवर हल्लाबोल

स्मार्ट मीटरला ‘चकवा’ देणे पडले महागात, वीजचोरीची १९ प्रकरणे उघडकीस; तब्बल…
2

स्मार्ट मीटरला ‘चकवा’ देणे पडले महागात, वीजचोरीची १९ प्रकरणे उघडकीस; तब्बल…

चिंचवडच्या महापारेषण उपकेंद्रात स्फोटानंतर आग, मेट्रोसह उद्योगांनाही बसला फटका; तब्बल…
3

चिंचवडच्या महापारेषण उपकेंद्रात स्फोटानंतर आग, मेट्रोसह उद्योगांनाही बसला फटका; तब्बल…

DSP Cricket : मान्सून लीगमध्ये साई सत्यम आणि मायटी स्टार्सचा डंका; प्रतिस्पर्ध्यांचा उडवला धुव्वा
4

DSP Cricket : मान्सून लीगमध्ये साई सत्यम आणि मायटी स्टार्सचा डंका; प्रतिस्पर्ध्यांचा उडवला धुव्वा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.