Wardha : पावसाची सर्वदूर संततधार ! आणखी २ दिवस बरसणार; शुक्रवारीही 'यलो अलर्ट'चा इशारा (Photo credit: Social Media)
वर्धा ब्युरो : रुसलेला वरुणराजा अखेर बळीराजावर प्रसन्न झाल्याने मंगळवारनंतर बुधवारीही जिल्ह्यात सर्वदूर पावसाची संततधार कायम होती. गत २४ तासात जिल्ह्यात २४.०९ मिमी पाऊस झाला असून सर्वाधिक पावसाची नोंद समुद्रपूर तालुक्यात घेण्यात आली. जिल्ह्यात पावसाची सुरू असलेली हळूवार का होई ना, ही संततधार पिकांसाठी संजीवनी ठरली आहे. तर हवामान विभागाच्या नागपूर येथील वेधशाळेने बुधवार व गुरुवारी जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट दिला होता. तर आता शुक्रवारीही हवामान विभागाने जिल्ह्यासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातील आपत्ती व्यवस्थापन विभाग नदी काठावरील गावांतील प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामात प्रामुख्याने कपाशी, सोयाबीन, तूर पिकांची लागवड करतात. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, जिल्ह्यात आतापर्यंत ९२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तर विश्रांती घेतलेल्या पावसाला सुरुवात होण्यापूर्वी प्रामुख्याने सोयाबीन पिकावर खोडमाशी, चक्रीभुंगा या आजारांची टांगती तलवार असतानाही या पिकासह कपाशी, तूर हेही अंकुरलेले पीक पाण्याअभावी माना टाकत असताना बऱ्यापैकी तग धरून राहिले. तर रुसलेला वरुणराजा आता पुन्हा बरसायला सुरुवात झाल्याने पीक परिस्थितीत बऱ्यापैकी सुधारणा बधून शेतकऱ्यांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे.
Gondiya: गोंदियात पावसामुळे तीन तालुक्यात अतिवृष्टी; भातशेतीला दिलासा- शेतकरी समाधानी
पावसाची जिल्ह्यात संततधार सुरू असली तरी जिल्ह्यात कुठेही पूरपरिस्थितीचे संकट निर्माण न झाल्याने कुठलाही रस्ता बंद झालेला नाही. पण संततच्या पावसामुळे काही प्रमाणात जनजीवनावर याचा परिणाम झाल्याचे वास्तव आहे.
यंदा जिल्ह्यात खरीप हंगामात ४.१८ लाख हेक्टरवर विविध पिकांची लागवड होण्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे. आतापर्यंत ९२ टक्के पेरण्या आटोपल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. २.१३ लाख हेक्टरवर कपाशी, १.१० लाख हेक्टरवर सोयाबीन तर ५७ हजार हेक्टरवर तूर पिकांची लागवड झाल्याची नोंद आतापर्यंत कृषी विभागाने घेतली आहे. शिवाय यावर्षी शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्त्वावर सूर्यफुल व मकाचे उत्पादन खरिपात घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले होते. त्यालाही बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. पण पावसाच्या दडीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली होती. तर पाण्याअभावी अंकुरलेली पिके माना टाकत होती. अशातच आता सुरू झालेली पावसाची संततधार या पिकांसाठी सजीवनीच ठरल्याने शेतकऱ्यांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे.
नांद प्रकल्प : १६.४९
वडगाव प्रकल्प : २४.८१
बोर प्रकल्प : ५७.९९
निम्न वर्षा प्रकल्प : ६३.२०
धाम प्रकल्प : ४९.०७
पौथरा प्रकल्प : १८.९५
पंचधारा प्रकल्प : २६.५१
डोंगरगाव प्रकल्प : ३६.६३
मदन प्रकल्प : २९.९२
लाल नाला प्रकल्प: २९.५५
वर्धा कार नदी प्रकल्प: ५८.०६
सुकळी लघु प्रकल्प : १६.१६
वर्धा – २७
सेलू – २९
देवळी – २१
आर्वी – २२.०४
आष्टी – १०.०३
कारंजा – १४.२
हिंगणघाट – २८
समुद्रपूर – ३४.६
नागपुरातील तलावांमध्ये वेगाने वाढतेय जलपर्णी; महापालिकेचा प्रयोग ठरतोय यशस्वी






