Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amit Thackeray : …तर रस्त्यावर उतरून मारू; अमित ठाकरेंचा परप्रांतीय रिक्षाचालकांना इशारा

ज्यांना मराठीचा अडसर वाटतोय त्यांनी खुशाल आपल्या राज्यात परत जावे, अशा कडक शब्दांत मनसे नेते अमित ठाकरे यांनी परप्रांतीय रिक्षाचालकांना सुनावले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 28, 2026 | 01:10 PM
...तर रस्त्यावर उतरून मारू; अमित ठाकरेंचा परप्रांतीय रिक्षाचालकांना इशारा

...तर रस्त्यावर उतरून मारू; अमित ठाकरेंचा परप्रांतीय रिक्षाचालकांना इशारा

Follow Us
Follow Us:

पिंपरी : महाराष्ट्र आणि मुंबई चालवण्यास आमचा मराठी रिक्षाचालक सक्षम आहे. त्यामुळे ज्यांना मराठी येते त्यांनाच परवाने देण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. ज्यांना मराठीचा अडसर वाटतोय त्यांनी खुशाल आपल्या राज्यात परत जावे, अशा कडक शब्दांत मनसे नेते अमित ठाकरे यांनी परप्रांतीय रिक्षाचालकांना सुनावले. आगामी ४ तारखेच्या संपाच्या पार्श्वभूमीवर बोलताना, “आमच्या अंगावर आलात तर रस्त्यावर उतरून मारू,” असा थेट इशाराही त्यांनी यावेळी दिला.

 

पिंपरी येथे रविवारी (दि. २६) आयोजित ‘कार्यकर्ता संवाद’ मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मनसे नेते अविनाश अभ्यंकर, अमेय खोपकर आणि शहराध्यक्ष सचिन चिखले उपस्थित होते.

प्रशासकीय अपयश आणि स्थानिक प्रश्न

राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करताना अमित ठाकरे म्हणाले की, ‘लाडकी बहीण’ सारख्या योजना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणल्या आहेत. पुण्यातील गंभीर पाणीटंचाई आणि नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली होणारी वृक्षतोड या स्थानिक समस्यांवर सत्ताधाऱ्यांनी मौन सोडावे. आज शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे प्रश्न वाऱ्यावर असून सरकार केवळ जाहिरातबाजीत मग्न आहे, अशी टीका त्यांनी केली.

हे सुद्धा वाचा : देवस्थान इनाम जमिनींचा प्रश्न सुटणार, येत्या तीन दिवसांत…; चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

ड्रग्जचा विळखा आणि पोलिसांची भूमिका

“आज शाळा-महाविद्यालयांच्या उंबरठ्यापर्यंत ड्रग्ज पोहोचले आहे. तरुण पिढी उद्ध्वस्त होत असतानाही प्रशासन ढिम्म आहे. जर हा विळखा तोडायचा असेल, तर पोलिसांना राजकीय दबावाशिवाय २४ तास ‘फ्री हॅण्ड’ दिला पाहिजे,” असे आग्रही प्रतिपादन अमित ठाकरे यांनी ड्रग्ज प्रकरणावर बोलताना केले.

मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर

रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून राज्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी मुदत देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे संकेत मिळाले आहेत. मुळात 1 मे 2026, महाराष्ट्र दिनापासून मुंबईतील रिक्षाचालकांसाठी मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय लागू होणार होता. मात्र, नव्या घडामोडीनुसार ही सक्ती तत्काळ लागू न करता काही काळासाठी पुढे ढकलण्याचा विचार सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत देण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. या कालावधीत कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नसल्याचेही सांगितले जात आहे. या निर्णयामुळे रिक्षाचालकांमध्ये निर्माण झालेली भीती आणि अस्वस्थता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. रिक्षा संघटनांनी दिलेल्या संपाच्या इशाऱ्याचाही या निर्णयावर परिणाम झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, प्रताप सरनाईक यांनी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नसून अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. “मराठी शिकणं आवश्यक आहे, त्याला पर्याय नाही. मुदत दिली तरी ती पाळून भाषा शिकली पाहिजे,” असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: Mns leader amit thackeray has warned migrant rickshaw drivers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • amit thackeray
  • CM Devedra Fadnavis
  • MNS

संबंधित बातम्या

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
1

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
2

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

मानीव दिनांकापासूनची पदोन्नती प्रक्रिया रद्द करा; अन्यथा…; मनसेचे महापालिका प्रशासनाला निवेदन
3

मानीव दिनांकापासूनची पदोन्नती प्रक्रिया रद्द करा; अन्यथा…; मनसेचे महापालिका प्रशासनाला निवेदन

कल्याण–लातूर महामार्गाविरोधात जुन्नरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार! धरणे आंदोलनास सुरुवात; नेमकं मागण्या काय?
4

कल्याण–लातूर महामार्गाविरोधात जुन्नरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार! धरणे आंदोलनास सुरुवात; नेमकं मागण्या काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.