फोटो सौजन्य सोशल मिडिया
MPCB News : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील कथित आर्थिक व्यवाहार झाल्याबद्दल संबंधित सहा अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहेत. प्रदूषण महामंडळात मोठा आर्थिक व्यवहार होत आहेत. यामध्ये मोठे आर्थिक घोटाळे झाल्याचे समोर येत आहेत. ही कारवाही पुण्यातील औद्योगिक परवानग्यांशी संबंधित कथित आर्थिक व्यवहारांच्या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) एकून सहा अधिकारी निलंबित झाले असून निलंबित अधिकाऱ्यांमध्ये एका प्रादेशिक अधिकाऱ्याचा समावेश आहे, तर दोन उप-प्रादेशिक अधिकाऱ्यांचा समावेश असून यामध्ये तीन क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
अधिकृत आदेशानुसार, प्राप्त तक्रारींसोबत व्हिडिओ पुरावेही सादर करण्यात आले होते आणि या अधिकाऱ्यांनी दिलेले स्पष्टीकरण असमाधानकारक ठरवून फेटाळण्यात आले. याप्रकरणी विभागीय चौकशी अद्याप प्रलंबित आहे.
निलंबित अधिकाऱ्यांचा पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल होत असून पैसे घेतानाचा व्हिडीओ हा सप्टेंबर मधला आहे. या प्रकरणी अनेक तक्रार करण्यात आल्या होत्या. याची ईमेल द्वारे देखील तक्रार करण्यात आली होती. साहेबांच्या आदेशा नुसार पैसे स्विकारले झाल होते; पण हे साहेब कोण आहेत ? याचा शोध घेणे महत्वाचे आहे.
MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; पुण्यातील आंदोलनाचा सलग 9 वा दिवस
उद्योगांना मंजुरी देण्याच्या प्रक्रियेत या प्रकरणाचा काय संबंध आहे. याची सखोल चौकशी होणार आहे. चौकशीच्या अधीन राहून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, पुढील आदेश येईपर्यंत निलंबन कायम राहणार आहेत. असे आदेश नमूद केले आहे.
निलंबनाच्या कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांचे मुख्यालय मुंबई येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयात निश्चित करण्यात आले आहे. तसेच नियंत्रण अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे






