पुणे : बालेवाडी-म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू झालेल्या हॉकी स्पर्धेत सलामीच्या लढतीत हॉकी नाशिकने ऑलिम्पियन भास्करन हॉकी अकादमीवर 2-1 असा विजय मिळवला. एच गटात रिपब्लिकन स्पोर्ट्स क्लब आणि चेन्नई इलेव्हन यांच्यात 2-2 अशी बरोबरी राहिली. एफ गटात प्रयागराज, उत्तर प्रदेश येथील विजय हॉकी अकादमीने पदार्पणात संगरूरच्या गगन बाबा साहिब दास अकादमीचा 2-1 असा पराभव केला.
मुंबईने सामना एकतर्फी फिरवला
संध्याकाळच्या लढतींमध्ये अ गटातील मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन (एमएसएसए) विरुद्ध तामिळनाडू हॉकी अकादमी यांच्यातील सामना एकतर्फी झाला. त्यात मुंबईच्या संघाने 14-0 असा मोठा विजय मिळवला. कर्णधार सशांक कुमार (2’, 21’, 38’, 50’, 54’ – पीसी, 56’ – पीसी) आणि गौरव कुमार यादवने (15’, 23’, 31’, 33’ 42’, 58’) प्रत्येकी सहा गोल करताना विजयात मोलाचा वाटा उचलला.
प्रमुख पाहुणे आयकर विभागाचे अतिरिक्त-आयुक्त हर्षद एस. आराधी (आयआरएसस) यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पधर्र्ेचे उद्घाटन झाले. यावेळी एसई सोसायटीच्या एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डी. के. भोसले, एस.ई. सोसायटीच्या एसबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. ऋतुजा भोसले, एस.ई. सोसायटीच्या एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा डॉ. वृषाली भोसले, एस.ई. सोसायटी एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या संचालिका देवयानी भोसले आणि एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे शारीरिक शिक्षण संचालक फिरोज शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल :
सी गट : हॉकी नाशिक: 2 (यद्नेश विशाल पगार 3’ – पीसी, इबाद इरफान पाटे 8’) विजयी वि. ऑलिंपियन भास्करन हॉकी अकादमी: 1 (एम बराथ 18’). मध्यंतर: 2-1
एच गट : रिपब्लिकन स्पोर्ट्स क्लब: 2 (फौआद शेख 18’, ज्ञानेशकुमार विजकापे 42’ -पीसी) बरोबरी वि. चेन्नई इलेव्हन: 2 (प्रजीन एस 39’, प्रदीप – 53’ – पीसी). मध्यंतर: 0-0
एफ गट: विजय हॉकी अकादमी, प्रयागराज: 2 (गुरुदत्त गुप्ता 19’, अबिकत पाल 39’) विजयी वि. गगन बाबा साहिब दास अकादमी, संगरूर: 1 (ओम सिंग 34’). मध्यंतर: 1-0
ब गट : रितू राणी अकादमी विजयी वि. हॉकी इटावा – पुढे चाल
अ गट : मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन (एमएसएसए): 14 (शशांक कुमार 2’, 21’, 38’, 50’, 54’ – पीसी, 56’ – पीसी, विशाल वेर्णा 5’ – पीसी, 16’ – पीसी, गौरव कुमार यादव 15’, 23’, 31’, 33’ 42’, 58’) विजयी वि. तामिळनाडू हॉकी अकादमी: 0. मध्यंतर: 6-0