भिवंडी पोलिसांनी केला खुनाचा उलगडा (फोटो -istockphoto)
पोलिसानी 24 तासांत लावला गुन्ह्याचा छडा
पतीनेच केली पत्नीची हत्या
आरोपीला कोर्टाने सुनावली कोठडी
Bhiwandi Crime News: अखेर भिवंडीमधील महिलेच्या खुनाचा उलगडा झाला आहे. भिवंडीमधील भोईवाडा पोलिसांनी या खुनाचा छडा लावला आहे. भिवंडी शहराजवळ असलेल्या खाडीजवळील एका भागात एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेचे शिर धडापासून वेगळे करण्यात आले होते. अखेर पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. हे प्रकरण नेमके काय आहे ते जाणून घेऊयात.
भोईवाडा पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा केवळ 24 तासांमध्ये केल्याचे समोर आले आहे. मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव मुस्कान असल्याचे समजते आहे. या गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आली आहे. महिलेच्या पतीनेच तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. भिवंडीत असणाऱ्या खाडीजवळील एका दलदलीच्या परिसरात एक महिलेचा मृतदेह आढळून आला होता.
‘आई, मला घरी जायचं…’, भर रस्त्यात रडणारा मुलगा दिसला तर वेळीच सावध व्हा, काय आहे नेमकं प्रकरण?
नेमके प्रकरण काय?
पोलिसांनी या घटनेचा तपास जेव्हा सुरू केला तेव्हा इदगाह परिसरात असणाऱ्या झोपडपट्टीमधील एक महिला बेपत्ता असल्याचे समोर आले होते. मग पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर हा मृतदेह मुस्कानचा असल्याचे समोर आले. पुढे तपास करत असताना तिचा नवरा घरी नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी तपास करून त्या नवऱ्याला अटक केळी व त्याची चौकशी सुरू केली. पोलिसांनी कसून चौकशी केली असतां हा खून नवऱ्यानेच केल्याचे उघड झाले.
खुनाचे कारण काय?
दोन वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे आणि खून करणाऱ्या नवऱ्याचे लग्न झाले होते. दोघांनी प्रेमविवाह केला होता. दोघेही एकमेकांवर चारित्र्यावरून संशय घेत असल्याचे समोर आले आहे. एके दिवशी रील्स करण्यासाठी ती बाहेर निघून गेली, त्यामुळे दोघांमध्ये मोठे भांडण झाले. नवरा आपल्या मुलाला देखील मारहाण करत असल्याने त्यांच्यात वाद होते. या वादातून नवऱ्याने मुस्कानची क्रूरपणे हत्या केली.
पतीने मुस्कानची हत्या केल्यावर तिचे शिर धडावेगळे केले. खाडीत भरतीचे पाणी वाढले असताना मृतदेह त्यात फेकून पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केला. दरम्यान त्यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिक व श्वान पथक बोलावून तपास सुरू केला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला कोर्टाने कोठडी सुनावली आहे.