पोलिसांकडून डेटा ऑपरेटरना अटक (फोटो - istockphoto)
पुणे: पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणी दाखले दिले जाताते. मृत्यूचे बनावट दाखले देणारी टोळी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोकणातील श्रीवर्धन येथे पुणे महापालिकेकडून देण्यात आलेल्या खोट्या मृत्यू दाखल्याच्या आधारे एक एकर जमिन खरेदी –विक्री झाल्याचा प्रकार समोर आले आहे. याप्रकरणात रायगड जिल्ह्यातील दिघी पोलिसांनी धनकवडी क्षेत्रिय कार्यालयातील दोन डेटा ऑपरेटला ताब्यात घेतले आहे. तसेच मृत्यू दाखल्यासाठी देण्यात आलेल्या कागदपत्रे मागितली आहेत. मात्र, दाखल्यासाठी दिलेले कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसल्याचे चौकशितून समोर आले आहे.
श्रीवर्धनमध्ये जिवंत व्यक्तीचा मृत्यू दाखला पुणे महापालिकेच्या धनकडी क्षेत्रीय कार्यालयातून 25 मे 2021 रोजी देण्यात आला आहे. विशेष म्हणजे रायगड पोलिसांकडे एक एकर शेतीची खरेदी विक्री करुन फसवणूक झाल्याचा प्रकार रायगड जिल्ह्यातील दिघी पोलिसांकडे आले होते. त्यानंतर दिघी पोलिसांनी पुणे मनपाच्या धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाला पात्र पाठवून मृत्यू दाखला काढण्यासाठी सादर केलेल्या कागपत्रे मागितली आहेत. त्यानंतर हा प्रकरण समोर आले आहे. मनुष्यबळ पुरविणाऱ्या कंपनीच्या डेटा ऑपरटेर आणि तत्कालिन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा दाखला दिला असल्याचे समोर आले आहे. डेटा ऑपरटेरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांना चौकशीसाठी हजर करावे, असे कळवले आहे.
हेही वाचा: Pune Water News: पुण्यात ‘पाणी’ पेटणार! ७१४ काेटी रुपये न भरल्यास…; महानगरपालिकेला नोटीस
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यीय समिती गठीत केली आहे. या समितीने केलेल्या प्राथमिक महितीनुसार संबंधित मृत्यू दाखला देण्यासाठी सादर केलेले कागदपत्रे क्षेत्रिय कार्यालयाला मागितले. मात्र, त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर ऑनलाईन प्रणालीमध्ये हा दाखला 21 मे 2025 रोजी दिला गेला आहे, अशी नोंद आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांची स्वाक्षरी
जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी दाखले हे ऑनलाईन पद्धतीने दिले जातात. त्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी निंबधकामर्फत होत असते. तर क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या डिजीटल स्वाक्षरीने दाखला दिला जातो. त्यामुळे या प्रकरणात डेटा इंट्री ऑपरेटरने अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून हा प्रकार केला आसवा. या प्रकरणात डेटा इंट्री ऑपरेटरला कामावरुन काढून टाकले आहे. तसेच शहरीतल सर्व क्षेत्रिय कार्यालयांना कागदपत्रे तपासूनच दाखले द्यावेत, अशा सूचना दिल्या आहेत.
– डॉ. निना बोराडे, आरोग्य प्रमुख,पुणे, मनपा
पुण्यात ‘पाणी’ पेटणार
दरवर्षी प्रमाणे जलसंपदा विभागाने महापािलकेला पाणीपट्टी थकबाकीसाठी पाणी कपातीचा इशारा दिला आहे. गेल्या तीन वर्षांत महापािलकेने चारशे काेटी रुपयाहून अधिक रुपये जलसंपदा विभागाकडे जमा केले आहे. आता ७१४ काेटी रुपयांची थकबाकी २५ फेब्रुवारीपर्यंत भरली नाही तर, टप्प्याटप्प्याने पुण्याचा पाणी पुरवठा कमी केला जाईल असे पत्र महापािलकेला पाठविले आहे.