पुण्यात ५२ टाक्यांची स्वच्छता
पुणे:शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या १४४ पाण्याच्या टाक्यांपैकी ५२ टाक्यांची स्वच्छता केली गेली आहे. अशुद्ध पाण्यामुळे उदभवलेले जीबीएस आजाराचे संकट दुर करण्यासाठी प्रशासनाने शहरातील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. तर जीबीएस बाधित क्षेत्रातील वीसहून अधिक टाक्या अद्याप अस्वच्छ आहेत.
जानेवारी आणि फेब्रुवारी महीन्यात शहरात जीबीएस आजाराचे संकट निर्माण झाले. अद्याप हे संकट पुर्णपणे दुर झाले नाही. जीबीएस आजार हा अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे हाेत असल्याची माहीती पुढे आली आहे. हे. या पार्श्वभुमीवर महापालिकेच्या पाणी पुरवठाविभागाने जानेवारी, फेब्रुवारी महीन्यात जीबीएस बाधित क्षेत्र असलेल्या सिंहगड रस्ता भागातील उपनगरातील पाणी पुरवठा यंत्रणेची माहीती घेतली. यंत्रणेतील त्रुटी दुर करण्याचा प्रयत्न केला गेला. टॅंकर द्वारे पाणी पुरवठा करणारे, तसेच आर अाेओ प्लांट मधून केला जाणारा पाणी पुरवठा यांच्याकरीता नियमावली तयार केली. त्याचवेळी महापािलकेच्या पाणी पुरवठाविभागाच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला हाेता.
केवळ जीबीएस बाधित क्षेत्रातील पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्याच नाही तर संपुर्ण शहरातील पाण्यांच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात येत आहे. शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या १४४ टाक्या असुन, त्यापैकी ५२ टाक्यांची स्वच्छता पुर्ण झाल्याची माहीती पाणी पुरवठाविभागाचे प्रमुख नंदकिशाेर जगताप यांनी दिली. तर बाधित क्षेत्रात ४४ पाण्याच्या टाक्या असुन, यापैकी २४ टाक्यांची स्वच्छता करण्याचे काम पुर्ण झाले आहे. पाण्यांच्या टाक्यांची स्वच्छता सुरु असल्याने नागरीकांना पाणी काळजीपुर्वक वापरावे लागणार आहे.
GBS च्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका प्रशासन ‘अॅक्टिव्ह मोड’वर; टाक्यांची स्वच्छता केली सुरु
दरम्यान, शहराच्या उपनगरांत आर ओ प्लांट व्यावसाियकांकडून पाणी पुरवठा केला जात आहे. या आर ओ प्लांटमधून हाेणारा पाणी पुरवठाही शुद्ध नसल्याने त्यांच्याकरीता नियमावली केली हाेती. याभागातील पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी काही आर ओ प्लांट पुन्हा सुरु करण्याची परवानगी दिली गेली हाेती. ते पुन्हा बंद केले गेले असुन, नव्याने बारा जणांनी अर्ज केले आहे. त्यापैकी चार जणांना आर ओ प्लांट सुरु करण्याची परवानगी दिली आहे. आठ जणांनी कागदपत्रांची पुर्तता न केल्याने त्यांचे अर्ज नामंजुर केले आहेत.
Guillain-Barré Syndrome: पुणे शहरात चिंता वाढली; गुलियन बॅरी सिंड्रोमच्या रूग्णांमध्ये वाढ
बाधित भागासाठी क्लाेरींन प्लांट
बाधित क्षेत्रात शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी चार क्लाेरींन प्लांट उभे केले जाणार अाहे. त्यापैकी नांदेड गाव येथील विहीर अािण बारंगणे मळा येथील विहीर येथे प्लांंट बसविले आहे. तसेच खडकवासला आणि धायरी येथील टॅंकर पाॅईंट येथे क्लाेरींन प्लांट बसविले जाणार आहे. यासाठी ९५ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. तसेच वडगाव उड्डाणपुला खालील राॅ वाॅटरच्या लाईनमधुन हाेणारा पाणी पुरवठा थांबविण्यात येईल. त्या लाईनला शुद्ध पाणी पुरवठ्याची वाहीनी जाेडली जाणार आहे.