खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला (फोटो- ani)
पुणे/Pune Heavy Rain Update: राज्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान मध्यंतरी काही दिवस पुणे शहरात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र दिसून आले होते. मात्र दोन दिवसांपासून पुणे शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान खडकवासला धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे.
पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुठा नदीपत्रात हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान खडकवासला धरणातून सध्या मुठा नदीपात्रात 15, 442 क्युसेकने विसर्ग केला जात आहे. त्या आधी धरणातून 11 हजार 878 ने विसर्ग केला जात होता. आता हा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
मुळा-मुठा नदीकाठच्या परिसरांमध्ये पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संभाव्य पूरस्थितीबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना नदीकाठच्या रस्त्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, पुणे आणि परिसरातील घाटमाथ्यांवर जोरदार पावसाची नोंद झाली.
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन#PuneRains#DisasterManagement pic.twitter.com/4OColcTOWB
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) August 19, 2025
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून #मुठानदी पात्रामध्ये सुरु असलेल्या ११ हजार ८७८ विसर्गात दुपारी २ वाजता १५ हजार ४४२ इतकी वाढ करण्यात येणार आहे. प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे.
– उपविभागीय अभियंता,
मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग,
स्वारगेट, पुणे
Konkan Rain Update: कोकणाला धू-धू धुतलं; चिपळूण, रत्नागिरीत पाणी शिरले, सिंधुदुर्गमध्ये तर…
पानशेतमधून देखील विसर्ग सुरू
पानशेत धरणामधून नदी पात्रामध्ये सुरु असलेल्या विसर्गामध्ये वाढ करुन आज दुपारी २ वा. ७ हजार ८४४ क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे.
-उपविभागीय अभियंता,
मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग पुणे
पुण्यात देखील मुसळधार
पुणे शहरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुणे शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे अणे ठिकाणी वाहतूक कोंडीचा फटका नागरिकांना बसला आहे. खडकवासला धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आला आहे. राज्यभरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. मुंबई, पालघर, कोकणाला तर पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. राज्यातील सवर्च भागात अत्यंत मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईत तर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.