Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune LPG Cylinder Fraud : पुण्यात फसवणूकीचा नवा प्रकार? सिलेंडरमधून गॅस ऐवजी निघालं पाणी; VIRAL VIDEO ने धुमाकूळ

Pune LPG Cylinder Fraud Video : संपूर्ण जग इंधन आणि उर्जा संकटाचा सामना करत असताना पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्याचा घरगुती सिलेंडरमध्ये गॅस ऐवजी पाणी आढळले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नागरिकांन मूलभूत गरजांसाठी देखील त्रास सहन करावा लागत असल्याचे म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 28, 2026 | 05:02 PM
LPG Price Hike : घरगुती सिलेंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; 'इतक्या' रुपयांनी महाग झाला गॅस

LPG Price Hike : घरगुती सिलेंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; 'इतक्या' रुपयांनी महाग झाला गॅस

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात फसवणूकीचा नवा प्रकार?
  • सिलेंडरमधून गॅस ऐवजी निघालं पाणी
  • सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओने धुमाकूळ
Pune LPG Cylinder Fraud Viral Video : एकीकडे अमेरिका इराण युद्ध (US Iran Conflict) पेटले आहे, ज्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनी बंद होऊन जागतिक बाजारपेठेत इंधन आणि उर्जा पुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे संपूर्ण जगावर इंधन आणि उर्जा संकट निर्माण झाले आहे. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या आहे. तसेच व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडरही महागले आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचे फटके बसत आहे. अशा परिस्थितीत पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या जय भवानी जनता वसाहतीत एका घरगुती LPG सिलेंडरमधून गॅसऐवजी चक्का पाणी आढळ्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

जावई धोंडे जेवायला गेले अन् लाखाचा ऐवज विसरून आले; दुकानदाराला समजताच पर्स केली परत

नेमकी काय घटना आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, जय भवानी वसाहतीतील स्थानिकांनी तक्रार केली आहे की, त्यांना पुरवल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरमध्ये पाणी आढळले आहे. स्थानिकांच्या तक्रारीनुसार, जवळपास ३ ते ४ लिटर, तर काही सिलेंडरमध्ये तब्बल १० किलोपर्यंत पाणी असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, सिलेंडर नीट काम करत नव्हता त्यावेळी त्याची तपासणी करण्यात आली. यावेळी सिलेंडरमध्ये गॅस ऐॅवजी पाणी आढळले.

नागरिकांकाडून तीव्र संताप व्यक्त

या प्रकारामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मूलभूत गरजांसाठी देखील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. लोकांनी संताप व्यक्त करत, आम्ही पैसे भरतो, याचे मिळते काय, पाणी? असा प्रश्न केला आहे.

लोकांनी याबाबत गॅस एजन्सीकडे तक्रारी देखील केल्या आहे. यामुळे स्थानिक ग्राहकांनी फसवणूक आणि पुरवठ्यात सखोल चौकशीची मागणी केली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने या प्रकरणाची चौकशी करावी असे नागरिकांचे म्हटले आहे. तर घरगुती गॅस सिलेंडर वितरकाने सिलेंडर थेट कंपनीकडून येतो असे सांगत या घटना कमी घडतात असे म्हटले आहे.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल

या घटनेचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक नागरिक सिल बंद सिलेंडरची तपासणी करत आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की सिलेंडरमध्ये पेन सारखी वस्तू घातल्यानंतर त्यातून पाणी पडताना दिसत आहे.

इराण युद्धाचा थेट फटका भारताला

२८ फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात मोठी लष्करी कारवाई सुरु केली होती. या लष्करी कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू झाला असून मध्यपूर्व पेटून उठले. इराणने संतप्त होत जगातील सर्वात महत्त्वाचा व्यापारी वाहतूकीचा मार्ग होर्मुझ (Hormuz) सामुद्रधुनी बंद केली. परिणामी या मार्गावरुन सौदी अरेबिया, यूएई, यांसारख्या देशांकडून होणारी कच्चे तेल आणि वायू वाहतूक थांबली आणि जागतिक बाजरपेठेत इंधन आणि उर्जा संकट निर्माण झाले. ज्याचा भारताला मोठा फटका बसला आहे. या मार्गावरुन इराणकडून होणार तेल आणि वायू पुरवठा देखील थांबला असल्याने देशात मोठी टंचाई निर्माण झाली आहे. ज्याचा सर्वसामान्यांना चांगला फटका बसत आहे.

सिलेंडर में गैस की जगह निकला पानी ! वीडियो वायरल ◆ पुणे के जय भवानी जनता वसाहत की है घटना #Pune | Pune Gas Cylinder pic.twitter.com/6XJhccPLSF — News24 (@news24tvchannel) May 28, 2026

मोठी बातमी! वीर धरणातील ‘इतका’ टक्के पाणीसाठा शिल्लक; तर निरा प्रणालीत…

Web Title: Pune lpg cylinder fraud water instead of gas viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • LPG
  • pune news
  • viral video

संबंधित बातम्या

Pune Water Supply: चिंता मिटली! पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापर्यंत पाणीकपात टळली
1

Pune Water Supply: चिंता मिटली! पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापर्यंत पाणीकपात टळली

आईनं लग्न ठरवलं अन् लेकीनं टक्कल केला? सोशल मीडियावर उडाला एकच गोंधळ, VIDEO तुफान व्हायरल
2

आईनं लग्न ठरवलं अन् लेकीनं टक्कल केला? सोशल मीडियावर उडाला एकच गोंधळ, VIDEO तुफान व्हायरल

पुण्यात पावसाची प्रतीक्षा कायम; पुढील चार दिवस कोरडे हवामान राहण्याचा अंदाज
3

पुण्यात पावसाची प्रतीक्षा कायम; पुढील चार दिवस कोरडे हवामान राहण्याचा अंदाज

पुणेकरांना दिलासा नाहीच ! 15 जुलैपासून पुन्हा सुरू होणार दिवसाआड पाणीपुरवठा
4

पुणेकरांना दिलासा नाहीच ! 15 जुलैपासून पुन्हा सुरू होणार दिवसाआड पाणीपुरवठा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.