Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; तब्बल 38 हजार कोटींची एफआरपी खात्यात जमा

साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. एकूण ४० हजार कोटी रुपयांच्या एफआरपी देयकांपैकी तब्बल ३८ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 25, 2026 | 01:12 PM
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; तब्बल 38 हजार कोटींची एफआरपी खात्यात जमा

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; तब्बल 38 हजार कोटींची एफआरपी खात्यात जमा

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यातील २०२५-२६ च्या ऊस गाळप हंगामात साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. एकूण ४० हजार कोटी रुपयांच्या एफआरपी देयकांपैकी तब्बल ३८ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. साखर आयुक्तालयाने थकीत देयकांबाबत घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे ९५ टक्के रक्कम अदा करण्यात कारखान्यांना यश आले असून, यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळाली आहे.

 

या हंगामात सुरुवातीला एफआरपीची रक्कम देण्यास काही कारखान्यांनी टाळाटाळ केली होती. गेल्या महिन्यापर्यंत ही थकबाकी ५ हजार कोटी रुपयांच्या घरात होती. मात्र, साखर आयुक्तालयाने थकीत एफआरपीबाबत वेळोवेळी सुनावण्या घेऊन कारखान्यांना कडक सूचना दिल्या होत्या. प्रशासनाच्या या दबावामुळे थकबाकीमध्ये ३ हजार कोटींची घट झाली असून, आता केवळ २ हजार कोटी रुपये देणे शिल्लक आहे. ही उर्वरित रक्कमही लवकरच अदा केली जाईल, असा विश्वास साखर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

२०९ कारखान्यांचे गाळप यशस्वी

यंदाच्या हंगामात राज्यातील एकूण २०९ सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी गाळप प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे, यंदा अदा करण्यात आलेल्या एफआरपीमध्ये ऊसतोडणी आणि वाहतूक खर्चाचाही समावेश आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष मिळणारी रक्कम वाढली असून, पुढील हंगामाच्या नियोजनासाठी त्यांना आर्थिक बळ मिळाले आहे.

हंगामाची स्थिती एका दृष्टिक्षेपात

एकूण देय एफआरपी : ४०,००० कोटी

आतापर्यंत झालेली अदायगी : ३८,००० कोटी

शिल्लक थकबाकी : २,००० कोटी

गाळप पूर्ण केलेले कारखाने : २०९

ग्रामीण भागात समाधानाचे वातावरण

दरवर्षी एफआरपी देयकांसाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते, मात्र यंदा प्रशासकीय सक्रियतेमुळे बहुतांश रक्कम वेळेत जमा झाली आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, आगामी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी या निधीचा मोठा उपयोग होणार आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे महापालिकेतील सभागृहाच्या कामकाजावरून विरोधक आक्रमक; सर्वसाधारण सभेत नेमकं काय घडलं?

Web Title: Sugar factories in the state have provided huge financial relief to sugarcane farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • Farmers
  • Sugar Factory
  • Sugarcane

संबंधित बातम्या

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर
1

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत
2

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

कल्याण–लातूर महामार्गाविरोधात जुन्नरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार! धरणे आंदोलनास सुरुवात; नेमकं मागण्या काय?
3

कल्याण–लातूर महामार्गाविरोधात जुन्नरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार! धरणे आंदोलनास सुरुवात; नेमकं मागण्या काय?

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन
4

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.