Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरंदर विमानतळ बाधितांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा; मोबदला वितरणासाठीच्या विलंबाचं कारणही सांगितलं

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील ७० टक्के संमतीच्या दाव्यावर शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी खुलासा केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 23, 2026 | 01:19 PM
पुरंदर विमानतळ बाधितांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा; मोबदला वितरणासाठीच्या विलंबाचं कारणही सांगितलं

पुरंदर विमानतळ बाधितांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा; मोबदला वितरणासाठीच्या विलंबाचं कारणही सांगितलं

Follow Us
Follow Us:

पुणे : पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील ७० टक्के संमतीच्या दाव्यावर शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी खुलासा केला आहे. शेतकऱ्यांकडून संमतीची प्रतिज्ञापत्रे (अॅफिडेव्हिट) प्राप्त झाल्यानंतर संबंधित जमिनींचा ‘लीगल सर्च’ करावा लागतो. या प्रक्रियेस साधारण सहा ते सात दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर जमिनीवर कोणताही वाद किंवा हरकत नसल्यास संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात मोबदल्याची रक्कम जमा केली जाते. त्यामुळे मोबदला वितरणास काही प्रमाणात विलंब होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

सासवड येथे आयोजित करण्यात आलेला विशेष कॅम्प हा न्यायिक, अर्धन्यायिक आणि महसुली स्वरूपाच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठीच असल्याचे त्यांनी सांगितले. भूसंपादन प्रक्रियेस सामान्यतः अधिक कालावधी लागतो; मात्र प्रशासनाने हे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

वारसदारांच्या हरकती, मालकी हक्काचे वाद आणि इतर कायदेशीर अडचणी दूर करून स्थानिक शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोबदला मिळावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे डुडी यांनी नमूद केले. विमानतळ क्षेत्रातील सुमारे ३५ टक्के जमीन गुंतवणूकदारांच्या मालकीची असून, अद्याप कोणत्याही गुंतवणूकदाराला मोबदला देण्यात आलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रारंभी लहान व स्थानिक शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आले असून, पुढील सात ते आठ दिवसांत त्यांना मोबदला वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर सुमारे ७०० कोटी रुपयांच्या गुंतवणूकदारांच्या प्रकरणांवर निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : पुणे जिल्ह्यातील अपघातांचे सत्र रोखण्यासाठी मोहीम; आरटीओकडून 151 ‘ब्लॅक स्पॉट’ची संयुक्त पाहणी सुरू

जमिनीच्या मूल्यांकनात जास्त रक्कम दिली गेल्यास ती परत घेण्याचा अधिकार प्रशासनाला असल्याचेही डुडी यांनी स्पष्ट केले. सॅटेलाइट सर्वेक्षणाच्या आधारे एप्रिल २०२५ नंतर उभारण्यात आलेली बांधकामे अथवा इतर बाबींची पडताळणी केली जात आहे. चुकीने जास्त मोबदला दिल्याची काही प्रकरणे आढळून आल्याने संबंधित रक्कम परत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. काही शेतकऱ्यांच्या अर्जानुसार झाडे, विहिरी, घरे किंवा इतर मालमत्तेची नोंद राहिल्यास महसूल अधिकारी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करून त्याची नोंद करीत असल्याचेही जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याचा तरुणावर हल्ला; कोयत्याने डोक्यावर अन् हातावर सपासप वार

Web Title: The district collector has issued a clarification regarding the issues faced by farmers affected by the airport project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • Farmers
  • maharashtra
  • Purandar Airport

संबंधित बातम्या

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
1

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
2

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
3

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
4

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.