Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: यंदा वरुणराजाची अवकृपा? हवामान खात्याने वर्तवला ‘हा’ धोक्याचा इशारा

सध्या प्रशांत महासागरात ‘एल निनो’ स्थिती विकसित होण्यास सुरुवात झाली असून, मान्सून काळात त्याचा प्रभाव अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 30, 2026 | 02:35 AM
Maharashtra Rain Alert: यंदा वरुणराजाची अवकृपा? हवामान खात्याने वर्तवला ‘हा’ धोक्याचा इशारा
Follow Us
Follow Us:

देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता
वायव्य भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता
अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट वाढण्याचा अंदाज

सुनयना सोनवणे / पुणे: भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या २०२६ च्या नैऋत्य मोसमी पावसाच्या अद्ययावत दीर्घकालीन अंदाजानुसार, यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात देशभरातील पर्जन्यमान दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे ९० टक्के राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून, सरासरीपेक्षा कमी मान्सूनची शक्यता अधिक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या अंदाजात चार टक्के त्रुटीची मर्यादाही नमूद करण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या मल्टी मॉडेल एन्सेंबल प्रणालीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या या अंदाजानुसार, मध्य भारत, दक्षिण द्वीपकल्प आणि वायव्य भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. तर ईशान्य भारतात पाऊस सामान्य राहू शकतो. देशातील बहुतांश पावसावर अवलंबून असलेल्या कृषी क्षेत्रांचा समावेश असलेल्या ‘मॉन्सून कोअर झोन’मध्येही कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे खरीप हंगाम, जलसाठे, जलविद्युत निर्मिती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जून २०२६ महिन्यासाठीही हवामान विभागाने देशभरात कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. वायव्य भारत, ईशान्य भारत तसेच दक्षिण द्वीपकल्पातील काही भाग वगळता बहुतांश प्रदेशांत सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जूनमध्ये देशातील बहुतांश भागांत कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Water Crisis Impact : नवराष्ट्रचा दणका! ‘तहानलेल्या गावा’ला दिलासा! कोळथरे ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठ्यासाठी नियोजन सुरू

दरम्यान, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड, गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यांत जून महिन्यात उष्णतेच्या लाटेचे दिवस वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडूतील काही भागांमध्येही उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवू शकतो. उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे सार्वजनिक आरोग्य, वीज वापर आणि पाणीपुरवठा व्यवस्थेवर ताण येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

सध्या प्रशांत महासागरात ‘एल निनो’ स्थिती विकसित होण्यास सुरुवात झाली असून, मान्सून काळात त्याचा प्रभाव अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. एल निनोमुळे सामान्यतः भारतातील मान्सून कमकुवत होतो. दुसरीकडे, हिंदी महासागरातील ‘इंडियन ओशन डायपोल’ (आयओडी) स्थिती सध्या तटस्थ असून, ती मान्सून काळातही कायम राहण्याचा अंदाज आहे. कमी पावसाचा संभाव्य परिणाम लक्षात घेता, पाणी व्यवस्थापन, जलसंधारण, दुष्काळपूर्व तयारी आणि हवामान विभागाच्या पूर्वसूचना यंत्रणेचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उकाड्यापासून आता दिलासा मिळणार; राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

मॉन्सून हंगामात सरासरीच्या ९० % पावसाची शक्यता –
– देशात जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या ९० % (कमी / अधिक ४%) पावसाची शक्यता.
– ईशान्य भारत वगळता देशाच्या सर्व विभागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज.
– जून महिन्यात महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता.
– मान्सून काळात एल निनो आणि न्यूट्रल आयओडी स्थिती राहण्याचा अंदाज.

Web Title: The meteorological department has forecast below average rainfall in the india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
1

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर…
2

देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर…

Pune Rain: जुलैत ११९ वर्षांचा विक्रम मोडला, पण ऑगस्ट कोरडा! पुण्यात सप्टेंबरमध्ये कसा राहील पाऊस?
3

Pune Rain: जुलैत ११९ वर्षांचा विक्रम मोडला, पण ऑगस्ट कोरडा! पुण्यात सप्टेंबरमध्ये कसा राहील पाऊस?

राज्यातील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! 18 जिल्हे ‘रेड झोन’मध्ये, 32 जिल्ह्यांत पावसाची तूट
4

राज्यातील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! 18 जिल्हे ‘रेड झोन’मध्ये, 32 जिल्ह्यांत पावसाची तूट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.