सांस्कृतिक विभागाचा प्रस्ताव नव्याने मांडला जाणार (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे: पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक धोरणाचे सल्लागार यादीत अभिनेते राहुल साेलापुरकर यांचे नाव असल्यामुळे वाद निर्माण झाला हाेता. यापार्श्वभुमीवर स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आलेले सांस्कृतिक धाेरणाचा प्रस्ताव दफ्तरी दाखल केला गेला. अभिनेते साेलापुरकर यांनी नुकतेच वादग्रस्त विधान केले हाेते. दरम्यान, महापालिकेच्या सांस्कृतिक िवभागाने महापािलकेचे सांस्कृतिक धाेरण स्थायी समितीसमाेर मान्यतेसाठी ठेवले हाेते.
या धाेरणाच्या सल्लागारांच्या यादीत साेलापुरकर यांचे नाव अाल्याने त्यावर राजकीय वातावरण तापले हाेते. त्यावर महापालिकेने साधव पवित्रा घेत या बाबत कोणतीही समिती नेमण्यात आली नसून फक्त ज्या सांस्कृतिक विभागातील तज्ञ व्यक्तींशी चर्चा केली त्यांचीच नावे नमूद केलेली आहे, असे सांगितले होते. त्यानंतर गुरुवारी (दि.५) महापालिकेच्या सांस्कृतीक विभागाने सांस्कृतिक धोरण दप्तरी दाखल केले आहे. त्यामुळे भविष्यात या धोरणात प्रस्ताव विभागाकडून अभ्यासाअंती पुन्हा नव्याने तयार केला जाईल. असे अतिरिक्त आयुक्त पृथ्वारीज बी पी यांनी सांगितले.
पुणे महापालिकेकडून सांस्कृतिक धोरण तयार करण्यात आले होते. त्यासाठी धोरणाचा आराखडा तसेच नियोजन करण्यासाठी संभाव्य नावांची यादी तयार करण्यात आली आहे. या नावांमध्ये तज्ञ सल्लागार म्हणून वादग्रस्त आणि प्रसिध्द अभिनेते सोलापूरकर यांच्या नाव नमूद करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस वक्तव्य केल्यामुळे अभिनेता राहुल सोलापूरकर वादात सापडले होते.
छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्रात मोठा वाद पेटला होता. त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्यांनी माफी मागितल्यानंतर प्रकरण शांत झाले होते. परंतु पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक धोरणात त्यांचे नाव आल्यामुळे सरकारकडून त्यांना राजाश्रय दिला जात आहे का संतापजनक सवाल उपस्थित केला जात आहे. हा वाद होऊ नये, म्हणून महापालिकेने साधव पाऊल उचलत अद्याप हे धोरण तयार झालेले नाही. तसेच जी नावे आहेत ती चर्चा करुन नमूद केलेली आहेत. असे स्पष्ट केले होते. सध्या राजकीय वातावरण तापलेले असल्यामुळे महापाालिकेने या धोरणााचा प्रस्तावच रद्द केली. प्रस्ताव दप्तरी दाखल केल्याने आता पुन्हा नव्याने य विभागाकडून प्रस्ताव तयार केला जाईल. त्यानंतर स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला जाईल.
दरम्यान, या सांस्कृतिक धोरणाचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीसमोर कोणतीही पूर्व कल्पना न देता सादर केल्याने महापालिका आयु्क्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच सांस्कृतिक विभागाच्या प्रमुखांना आयुक्तांनी चांगलेच झापले होते. त्यामुळे या धोरणाची कोणतीही समिती नेमली नसल्याचे जाहीर पत्रकाद्वारे कळविण्यात आले होते.