Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

34 वर्षांनंतर उघडकीस आले गाव, मंदिरांचे दर्शन होताच स्थानिक ग्रामस्थ भावूक; जुन्या आठवणींना उजाळा

खेड आणि शिरूर तालुक्यांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या चासकमान धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाल्याने तब्बल ३४ वर्षांपूर्वी जलाशयात गेलेल्या जुन्या वाडा गावाचे अवशेष पुन्हा एकदा उघडकीस येऊ लागले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 05, 2026 | 03:04 PM
34 वर्षांनंतर उघडकीस आले गाव, मंदिरांचे दर्शन होताच स्थानिक ग्रामस्थ भावूक; जुन्या आठवणींना उजाळा

34 वर्षांनंतर उघडकीस आले गाव, मंदिरांचे दर्शन होताच स्थानिक ग्रामस्थ भावूक; जुन्या आठवणींना उजाळा

Follow Us
Follow Us:

चास-वाडा : खेड आणि शिरूर तालुक्यांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या चासकमान धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाल्याने तब्बल ३४ वर्षांपूर्वी जलाशयात गेलेल्या जुन्या वाडा गावाचे अवशेष पुन्हा एकदा उघडकीस येऊ लागले आहेत. विशेषतः गावातील प्राचीन मंदिरांचे कळस आणि वास्तूंचे अवशेष दिसू लागल्याने विस्थापित ग्रामस्थांच्या आठवणींना उजाळा मिळत असून, परिसरात पर्यटकांचीही मोठी गर्दी होत आहे.

 

चासकमान धरण उभारणीसाठी अनेक गावांचे स्थलांतर करण्यात आले होते. त्यामध्ये भीमा नदीच्या काठावर वसलेले वाडा हे गाव सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे मानले जात होते. मोठी बाजारपेठ, पारंपरिक वाडे, धार्मिक यात्रा आणि विविध समाजघटकांतील सलोखा यामुळे गावाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती. धरण प्रकल्पामुळे १९९२ मध्ये हे गाव जलाशयाखाली गेले आणि अनेक कुटुंबांना आपली घरे, शेती व उपजीविकेची साधने सोडून नव्या ठिकाणी स्थलांतर करावे लागले.

पाण्याबाहेर दिसू लागली प्राचीन मंदिरे

धरणातील पाणी कमी झाल्यानंतर ग्रामदैवत धर्मराज मंदिरासह मारुती, विठ्ठल-रुख्माई, शनी, राम, लक्ष्मीनारायण, गणपती, भीमाशंकर आणि दत्त मंदिरांचे काही भाग पुन्हा दिसू लागले आहेत. विशेष म्हणजे जवळपास तीन दशकांहून अधिक काळ पाण्याखाली राहूनही या मंदिरांच्या रचना मोठ्या प्रमाणात सुस्थितीत असल्याचे दिसून येत आहे. मंदिरांचे कळस आणि बांधकामाचे अवशेष पाहताच अनेक विस्थापित ग्रामस्थ भावूक झाले. बालपणीचे दिवस, सण-उत्सव, यात्रा, गावातील सामाजिक जीवन आणि आपली जुनी घरे यांची आठवण पुन्हा जागी झाल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

इतिहास पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

पाण्याखालून बाहेर आलेल्या या मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील नागरिकांसह पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. अनेक जण या ऐतिहासिक वारशाचे छायाचित्रण करत असून, त्यामुळे नव्या पिढीला जुन्या वाडा गावाचा इतिहास समजण्यास मदत होत आहे.

हे सुद्धा वाचा : मनोज जरांगे पाटलांची मोठी मागणी राज्य सरकारकडून मान्य, आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर

धरणातील साठा चिंताजनक पातळीवर

यंदा अपुऱ्या पावसामुळे चासकमान धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. सध्या धरणात सुमारे ६.१३ टक्के (०.५२ टीएमसी) इतकाच साठा शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत साठा यापेक्षा अधिक होता. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि आगामी पावसाळ्यापर्यंतच्या गरजा याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक साठा राखून ठेवण्याचे नियोजन करण्यात आले असून आवर्तन बंद झाल्यानंतर साठा काही प्रमाणात स्थिर राहण्याची अपेक्षा आहे.

इतिहास, संस्कृती आणि भावनांचा संगम

चासकमान धरणातील पाणी ओसरल्यानंतर समोर आलेले जुने वाडा गाव हे केवळ दगड-मातीचे अवशेष नसून एका समृद्ध संस्कृतीचे, परंपरेचे आणि हजारो लोकांच्या आयुष्याशी निगडित असलेल्या आठवणींचे प्रतीक आहे. तीन दशकांनंतर पुन्हा दर्शन देणारी ही मंदिरे विस्थापित ग्रामस्थांसाठी भावनिक पर्वणी ठरत असून इतिहास आणि वर्तमान यांचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी देत आहेत.

Web Title: The remains of an old village that went into the reservoir many years ago are being discovered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • Khed
  • maharashtra
  • Shirur News
  • Shirur Taluka

संबंधित बातम्या

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ
1

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, डोक्यात मारला दगडी खलबत्ता; पत्नी गंभीर जखमी
2

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, डोक्यात मारला दगडी खलबत्ता; पत्नी गंभीर जखमी

‘विद्येच्या माहेरघरा’ची नवी ओळख, पुणे बनतेय अभियंत्यांचे शहर; शिक्षणनगरीपासून तंत्रज्ञाननगरीपर्यंतचा प्रवास
3

‘विद्येच्या माहेरघरा’ची नवी ओळख, पुणे बनतेय अभियंत्यांचे शहर; शिक्षणनगरीपासून तंत्रज्ञाननगरीपर्यंतचा प्रवास

माजी महसूल राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे निधन; मावळच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा
4

माजी महसूल राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे निधन; मावळच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.