Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महत्त्वाची बातमी ! पुण्यातील बहुतांश भागांत गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद; शुक्रवारीही कमी दाबाने पाणी

गांधी भवन, पॅनकार्ड क्लब, वारजे, चतुःश्रृंगी, होळकर, कोंढवे-धावडे तसेच वडगाव-राजीव गांधी पंपिंग परिसरातील विविध भागांमध्येही पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेस सहकार्य करावे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 25, 2026 | 12:16 PM
पुण्यातील बहुतांश भागांत गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद; शुक्रवारीही कमी दाबाने पाणी

पुण्यातील बहुतांश भागांत गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद; शुक्रवारीही कमी दाबाने पाणी

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत विविध जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये विद्युत, पंपिंग तसेच स्थापत्य विषयक तातडीची देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी (दि.२७) शहरातील बहुतांश भागांचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. त्यानंतर शुक्रवारी (दि.२८) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी २७ ऑगस्टपूर्वी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी केले आहे. पर्वती एचएलआर टाकी परिसरातील सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, कोंढवा खुर्द, अप्पर व लोअर इंदिरानगर, गंगाधाम, महर्षीनगर, पर्वती गावठाण आदी भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. भामा आसखेड जलकेंद्रांतर्गत लोहगाव, कळस, धानोरी, टिंगरेनगर, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, येरवडा आणि खराडी परिसर प्रभावित होणार आहे.

धाराशिवात मुसळधार पावसालाही न जुमानता आंबेडकरी एल्गार ! आनंदराज आंबेडकरांनी दिला सरकारला इशारा

एसएनडीटी एचएलआर परिसरातील औंध, बोपोडी, गोखलेनगर, पुणे विद्यापीठ, सेनापती बापट रोड, प्रभात रोड, पौड रोड, कर्वे रोड, वारजे आदी भागांनाही पाणीपुरवठा बंदचा फटका बसणार आहे. चांदणी चौक टाकीअंतर्गत बावधन, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस रोड परिसराचा समावेश आहे.

याशिवाय, गांधी भवन, पॅनकार्ड क्लब, वारजे, चतुःश्रृंगी, होळकर, कोंढवे-धावडे तसेच वडगाव-राजीव गांधी पंपिंग परिसरातील विविध भागांमध्येही पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

डोंगर चढून तळ्याची साफसफाई

मसूर-हणबरवाडी-निगडीच्या सीमेवर वसलेल्या थोरल्या डोंगरावर जलसंधारणाचा प्रेरणादायी अध्याय लिहिला गेला. सुमारे सहाशे मीटर उंचीच्या या बलाढ्य डोंगरावर ज्येष्ठ मंडळी, युवक, बालचमूंनी एकत्र येत श्रमदानाच्या माध्यमातून वर्षानुवर्षे दुर्लक्षित पडलेल्या मृत तळ्याला नवसंजीवनी दिली. भर उन्हाळ्यात प्रखर उन्हाची तमा न बाळगता डोंगर चढून तळ्याची साफसफाई केली. अन् त्याचे पुनरुज्जीवन केले. त्याच कष्टांचे फळ आज पावसाळ्यात दिसून येत आहे.

थोरल्या डोंगरावर श्रमदानाचा जागर ! गावकऱ्यांनी मृत तळ्याला दिली नवसंजीवनी; भर उन्हाळ्यातील कष्टाला पावसाळ्यात आले यश

 

Web Title: Water supply to remain suspended in most parts of pune on thursday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • pune news
  • Pune water supply
  • Water Issue

संबंधित बातम्या

शिक्षणाच्या प्रांगणात विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर? Pune University मध्ये ‘त्या’ रात्री नेमके काय घडले?
1

शिक्षणाच्या प्रांगणात विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर? Pune University मध्ये ‘त्या’ रात्री नेमके काय घडले?

मिया बाय तनिष्कचे पुण्यात नवे स्टोअर; जंगली महाराज रोडवर फेस्टिव्ह सीझनची शानदार सुरुवात
2

मिया बाय तनिष्कचे पुण्यात नवे स्टोअर; जंगली महाराज रोडवर फेस्टिव्ह सीझनची शानदार सुरुवात

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात
3

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात

Pune MLC Election : पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी भाजपचा शड्डू! रविंद्र चव्हाण मैदानात
4

Pune MLC Election : पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी भाजपचा शड्डू! रविंद्र चव्हाण मैदानात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.