Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Water Cut : पिंपरी-चिंचवडकरांनो, पाणी भरुन ठेवा! आज सायंकाळी पाणीपुरवठा राहणार बंद

पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात तातडीची स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामुळे मंगळवारी शहराचा सायंकाळचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 28, 2026 | 12:37 PM
पिंपरी-चिंचवडकरांनो, पाणी भरुन ठेवा! आज सायंकाळी पाणीपुरवठा राहणार बंद

पिंपरी-चिंचवडकरांनो, पाणी भरुन ठेवा! आज सायंकाळी पाणीपुरवठा राहणार बंद

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात तातडीची स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामामुळे मंगळवारी (२८ एप्रिल) शहराचा सायंकाळचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच, बुधवारी (२९ एप्रिल) सकाळी देखील पाणीपुरवठा विस्कळीत आणि कमी दाबाने होण्याची शक्यता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने वर्तवली आहे.

 

नेमके कारण काय?

महापालिकेच्या वतीने सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्र आणि क्षेत्रीय स्तरावर पाणीपुरवठा यंत्रणेची देखभाल करणे आवश्यक आहे. भविष्यात पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठा तांत्रिक बिघाड होऊ नये, यासाठी ही नियोजित दुरुस्ती केली जात आहे. मंगळवारी दिवसभर ही कामे चालणार असल्याने जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा मुख्य विसर्ग बंद ठेवण्यात येईल.

वेळापत्रकात झालेले बदल :

२८ एप्रिल (मंगळवार): संपूर्ण शहराचा सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहील.

२९ एप्रिल (बुधवार) : सकाळचा पाणीपुरवठा अनियमित आणि कमी दाबाने होईल.

“निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरील देखभाल-दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करून पाणीपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा साठा करून ठेवावा आणि काटकसरीने वापर करून सहकार्य करावे.” — प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका.

हे सुद्धा वाचा : बुधवार पेठेतील ‘त्या’ कुंटणखान्यातील चार फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना ठोकल्या बेड्या

पुणे शहरावर पाणीटंचाईचे सावट?

हवामान खात्याने अल निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे यंदा मान्सून कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केल्याने राज्य शासनाने पिण्याच्या पाण्याच्या काटेकोर नियोजनाचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील जलसंपदा व पाटबंधारे विभागाने अंमलबजावणी सुरू केली असून, यंदा प्रथमच धरणातील पाणीसाठा जूनऐवजी थेट ३१ ऑगस्टपर्यंत राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार प्रमुख धरणांमधील पाण्याचे नियोजन अधिक काटेकोरपणे केले जात आहे. वाढती लोकसंख्या, तसेच स्थलांतरित नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील पिण्याच्या पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे उपलब्ध साठ्याचा योग्य वापर आणि दीर्घकालीन नियोजन आवश्यक बनले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हवामान बदलामुळे मान्सून अनिश्चित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाने सर्व विभागांना पाण्याच्या काटकसरीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणांवरील अवलंबित्व लक्षात घेता, पावसाचे प्रमाण घटल्यास धरणसाठ्यावर थेट परिणाम होऊ शकतो आणि पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title: Water supply will be cut off in pimpri chinchwad this evening

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 12:37 PM

Topics:  

  • maharashtra
  • PCMC News
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

बेशिस्त वाहनचालकांना चाकण पोलिसांचा दणका; दीड महिन्यात तब्बल 9777 वाहनांवर कारवाई
1

बेशिस्त वाहनचालकांना चाकण पोलिसांचा दणका; दीड महिन्यात तब्बल 9777 वाहनांवर कारवाई

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ
2

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…
3

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
4

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.