Photo Credit- Social Media (जयश्री पाटलांविषयी आक्षेपार्ह विधानासंदर्भात राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रीया)
संगमनेर: मागील चार-पाच दिवसांपासून भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील आणि काँग्रेसच्या उमेदवार जयश्री थोरात यांच्यात शाब्दिक चकमकी झडत होत्या. त्यातच सुजय विखे पाटील यांच्या सभेदरम्यान, त्यांचे समर्थक वसंतराव देशमुख यांनीजयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यामुळे संगमनेरमध्ये राजकारण चांगलंच तापलं होतं.वसंतराव देशमुख यांच्या सभेनंतर संगमनेरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला. संतप्त जामावाने गाड्यांची तोडफोड केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर स्वत: जयश्री पाटील यांनीही याचा निषेध करत पोलीस स्टेशनबाहेर रात्रभर ठिय्या मांडला.
घटनेनंतर वसंतराव देशमुख फरार असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या, त्यानंतर आज सकाळी त्यांना संगमनेर पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलं. या सर्व प्रकारानंतर संगमनेरमध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यातून विखे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठली होती. या सर्व प्रकारावर भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी प्रतिक्रीया देत पलटवार केला आहे. “ज्या ठिकाणी महिलांचा अपमान होत असेल त्याठिकाणी आम्ही कधीच समर्थन करणार नाही. पण सामान्य जनतेत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना काहीतरी निम्मित हवं होतं. इथल्या कंत्राटदारांचं काय करायचं ते बघू.”
हेही वाचा: शेकडो उत्तर भारतीयांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश; मंत्री रविंद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पार पडला
“चौथी सभा झाल्यानंतर काहीतरी गडबड असल्याचे सुजय विखे पाटील यांच्या लक्षात आले. वसंत देशमुख यांच्या वक्तव्याचे मी समर्थन करणार नाही. पण अर्ध्या तासातचं सभेच्या ठिकाणी काही लोक काठ्या कुऱ्हाडी घेऊन जमा झाले. कार्यकर्त्यांना मारहाण करण्यासाठी आणि सुजयवर सुद्धा प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न होता. संगमनेरमध्ये इतका दहशतवाद मी कधी बघितला नाही.” असा आरोप विखे पाटील यांनी केला.
विखे पाटील म्हणाले,” वसंत देशमुख यांच्या वक्तव्यानंतर काही तासातच गाड्यांची जाळपोळ आणि तोडफोड झाली. गावागावत या घटनेचा निषेधार्थ फलक लागले पाहिजे होते. जनजागृती व्हायला हवी होती. पण तसे काहीच झाले नाही. मग तुम्ही कोणत्या निवडणुकीला सामोरं जाणार? संगमनेरमध्ये महायुतीचा उमेदवार कोण? यासंदर्भात आपण विचार करायला पाहिजे. उमेदवार कोणीही असला तरी युती म्हणू आपण भूमिका घेणे महत्त्वाचे होते. असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा: Maharashtra Election: युतीधर्म पाळण्यासाठी शिंदे-फडणवीसांची सदा सरवणकरांना साद? काय आहे अंदर की बात
”काँग्रेसच्या लोकांनी येऊन सभेत गोंधळ घातला. राजकारणात अशी घटना कधीच घडली नाही. या घटनेचं राजकारण करून आम्हाला राज्यात बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.चोराच्या उलट्या बोंबा सुरू आहेत. पण आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, असं या तालुक्याचे नेतृत्त्व आहे.” असा टोलाही विखे पाटील यांनी लगावला.