विखे पाटलांनी गड राखला! राहाता नगरपालीकेवर एकहाती सत्ता
राहाता नगरपालिकेत एकूण २० जागांसाठी मतदान झाले. येथे भाजप आणि शिवसेना शिंदे गुटाने यांच्या नेतृत्वाखाली एकत्र निवडणूक लढली होती. निवडणुकीत भाजप आणि सेनेचे १९ नगरसेवक निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदी देखील भाजपचे स्वाधीन गाडेकर यांनीही नगराध्यक्षपद बहुमताने जिंकले आहे.
खरं तर, नगर जिल्ह्यात बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. राधाकृष्ण विखे पाटलांचे पुत्र आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. इथून शरद पवार गटाच्या निलेश लंकेंना निवडून आणण्यासाठी बाळासाहेब थोरातांनी संपूर्ण ताकद लावली होती. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर विखे पाटलांनी संगमनेर विधानसभेत काढला होता. येथे बाळासाहेब थोरातांचा मोठा पराभव झाला होता.
त्यामुळे यंदाची राहाता नगरपालिकेची निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरली आहे. येथे विधानसभेच्या पराभवाचा बदला घेतला जाण्याची शक्यता असल्याची चर्चा होती. मात्र विखे पाटलांनी आपला गड राखला आहे. राहत्यामधील २० पैकी १९ जागांवर भाजप- सेनेचे नगरसेवक निवडून आले आहेत. तर नगराध्यक्षपदी भाजपचे स्वाधीन गाडेकर बहुमताने विजयी झाले आहेत.
दुसरीकडे, नेवासा नगरपंचायत निवडणुकीत दणक्यात विजयी झाले आहेत. त्यांच्या नगरसेवकाला जास्त मते मिळाली असली तरी त्यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाला आहे. त्यामुळे नेवासामध्ये गडाखांचा गड आला पण सिंह गेला, अशी स्थिती निर्माण झाली आहे. नेवासात 17 पैकी 10 जागा गडाखांच्या शेतकरी क्रांतीकारी पक्षाला मिळाल्या आहेत. तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत.एका जागेवर अपक्षांनी बाजी मारली आहे. मात्र नगराध्यक्ष पदी महायुतीचे डॉ करण सिंग घुले विजयी झाले आहेत. हा गडाखांना मोठा धक्का मानला जात आहे.






