Rahul Gandhi Attack on PM Modi : कॉंग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी भंडाऱ्यात प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला करताना, ते लोकांना केवळ भ्रमित करण्याचे काम करतात, तर दुसऱ्या बाजून त्यांचे मित्र अदानी लोकांच्या खिशातील पैसे काढण्याचे काम करीत आहेत. हे दोघे मिळून देशाच्या नागरिकांना भ्रमित करण्याचे काम करीत आहेत. त्याचबरोबर देशाच्या प्रत्येक गरीब महिलेला वर्षाला 1 लाख रुपये देण्याचे आश्वासनसुद्धा राहुल गांधी यांनी दिले.
#WATCH | Bhandara, Maharashtra: Congress leader Rahul Gandhi says, "These are the 5 main promises of our manifesto. We made our manifesto thoughtfully. It was not made in a closed room. It was made after talking to thousands of people… This is the people's manifesto…" pic.twitter.com/VOeYUXHxOX
— ANI (@ANI) April 13, 2024
काही व्यापाऱ्यांकरिता सरकार चालवली जातेय
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवळ काही व्यापाऱ्यांकरिता सरकार चालवली आहे. ज्या दिवशी मोदींची सरकार आली, तेव्हापासून अदानींची शेअर प्राईज कशी वाढलीये हे पाहायला मिळते. मुंबईचे एअरपोर्ट कोणाकडे तरी होते, त्याच्यावर ईडी, सीबीआयद्वारे इन्क्वायरी सुरू होते. त्यांनतर हा मुंबईचा एअरपोर्ट अदानींकडे जातो.
अनेक सरकारी कंपन्या व्यापाऱ्यांच्या घशात घालण्याचे काम
हे केवळ एअरपोर्टबाबत नाही, सर्व क्षेत्रात त्यांनी शिरकाव केला आहे. आज हिंदुस्थानमध्ये 22 असे लोक आहेत. ज्यांच्याकडे एवढे धन आहे, जे भारतातल्या बाकीच्या म्हणजे 50 टक्के जनतेकडे आहे. मोदी सारखे धर्मावर बोलतील, गरीबीवर बोलतील, तुम्हाला केवळ भ्रमित केले जात आहे. तुम्ही शर्ट घेतला तर त्यावर लागणारी जीएसटी तुम्ही तेवढीच द्यावा लागणार जेवढा अदानी देतोय. 24 तास मोदींना टीव्हीवर दाखवले जात आहे. मी हजारो लोकांना भेटलो. त्यांत गरीब, शेतकरी, दलित समाजातील दबक्या प्रवर्गातील अनेक होते, त्यांचे एवढेच म्हणणे आहे, बेरोजगारी, महागाई, शिक्षण ज्यावर बोलायला हे सरकार तयारच नाही.
राहुल गांधींनी दिलेली आश्वासने
गरीबातील गरीब तरुणाला एप्रिन्टशिप करायला मिळणार. या सरकारमध्ये 10 वर्षांत 30 लाख सरकारी पदे रिक्त आहेत. पेपर लिकच्या विरोधात कारवाई करणार, प्रायव्हेट कंपनी एक्साम देणार नाही. सरकार परीक्षा घेणार आणि मार्किंग देणार आहे. कोणताही शेतकरी 2 च गोष्टी बोलतो, अरब पतींचे कर्ज माफ होतात, आमचे कर्ज माफ का होत नाही. हिंदुस्थानच्या शेतकऱ्यांना का हमीभाव मिळत नाही. त्यांना पाहिजे ते दर का मिळत नाही. आम्ही देणार शेतकऱ्यांना योग्य दर. शेतकऱ्यांना आम्ही योग्य हमीभाव देणार, न्यायिक हमीभाव, कानुनी …..
हा तुमचा आवाज आहे. हे तुम्ही आम्हाला सांगितले आहे.
आम्ही शेतकऱ्यांचे, युवांचे, छोट्या व्यापाऱ्यांचे सरकार चालवणार आहे. 24 तास धर्माची वार्ता करणार, राममंदिर उद्घाटनाला देशाच्या राष्ट्रपतींना बोलावले नाही, कारण ते आदिवासी आहेत. ही वस्तुस्थिती आहे.
भारताच्या भविष्यासाठी जातीय जनगणना आहे. तुमच्याबरोबर धोका होतोय. पंतप्रधान म्हणतात, गरीबांची सरकार नाहीये, 20-25 मोठ्या व्यापाऱ्यांचे हे सरकार आहे.
आमचे 5 मोठे वायदे आहेत. आम्ही खूप विचार करून मॅनोफेस्टो बनवला आहे. आम्ही हजारो शेतकऱ्यांना भेटल्यानंतर आम्ही हा मॅनो फेस्टो बनवला आहे. हा आपला आहे. तुमच्या मनातील गोष्ट मी स्टेजवर लिहीली आहे.