खासदार सुनिल तटकरे यांच्या विकास निधीतून निसर्गाच्या सानिध्यात पानवे येथे उभारण्यात आलेली म्हसळा तालुका पश्चिम विभाग कुणबी समाज संघटना समाज संकुलाचे उद्घाटन करण्यात आलं. याचं लोकार्पण देखील खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात करण्यात आले.सुबक आणि सुंदर अशी उभारण्यात आलेल्या सभागृहाचे निर्मितीचे खासदार तटकरे यांनी कौतुक करताना हे सामाजिक सभागृह कोणा एकट्या दुकट्याचे नसुन ते माझे आहे अशी भावना जोपासली पाहिजे, असं तटकरेंनी सांगितलं आहे.
लोकांच्या मनातील भावना हाच आपला धर्म आणि कर्म आहे. मोबाईलच्या संदेशावर काम करणारा मी कार्यकर्ता आहे. उभारण्यात आलेली कुणबी समाज सभागृहाची वास्तु ही केवळ वार्षिक सर्व साधारण सभेसाठी न वापरता या सभागृहात समाजाच्या सर्वसामान्य माणसाला योग्य तो न्याय मिळण्यासाठी,रोजगार,व्यवसाय निर्मितीसाठी खुले व्यासपीठ निर्माण झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.कोकणातील 5 जिल्ह्यात कुणबी समाजाचे मोठे वास्तव्य आहे. 100वर्षांपुर्वी समाजाचे पूर्वजांनी कुणबी संघाची स्थापना करून मुंबई सारख्या ठिकाणी समाज वस्तीगृह उभारण्याचे उराशी स्वप्न बाळगले होते.त्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले साहेब असताना त्यांनी मुलुंड सारख्या ठिकाणी समाजाला भूखंड उपलब्ध करून दिला होता.त्यांच्या कार्याचे मानावे तेवढे आभार कमी असुन 49वर्षानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मुंबई येथील कुणबी समाज वस्तीगृहाला 1 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मला उपलब्ध करून देता आला हे मी माझे भाग्य समजत असल्याचे मनोगत खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून रयतेचे राज्य निर्माण केले.
इतिहासाचे साम्राज्य उभे केले त्या धर्तीवर आपल्याला जात पात धर्माचे पलीकडे जाऊन राज्यात महायुतीच्या आणि केंद्रात एनडीए सरकारमध्ये सत्तेत राहुन या भागाचा विकास साधायाचा आहे. येथे उद्योग व्यवसायाला आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रदूषण विरहित कारखानदारी आणायची आहे.येथे औद्योगिक वसाहत उभी करण्याचे आमचे स्वप्न आहे त्याची पूर्ती करण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या कडे संपर्क साधून बैठक केली असल्याचे तटकरे यांनी आवर्जून उल्लेख केले.हे सर्व करीत असताना तुम्ही दिलेली मोलाची साथ विसरता येणार नाही. माझी लेक आदिती तटकरे हिच्या नशिबात काय आहे हे मला माहिती नाही पण ती जिल्हा परिषद निवडणुकीत रोहा वरसे येथे उभी होती तेव्हा तिथे 10 हजार मताधिक्याने निवडून आली तर या वेळी श्रीवर्धन मतदार संघात,83 हजाराचे मतदान घेऊन आमदार व मंत्री झाली.
इतिहासात असे कधी घडले नव्हते त्याचा आनंद मी विसरू शकत नाही.लंडनला असलो तरी मला माझा श्रीवर्धन मतदार संघ नजरेत दिसतो असे गौरोदगार खासदार सुनिल तटकरे यांनी कुणबी समाजाचे स्वागत समारंभात काढले. आयोजीत भव्य कार्यक्रमात तहसीलदार सचिन खाडे,पोलीस निरीक्षक संदीप कहाले, गट विकास अधिकारी माधव जाधव,तालुका अध्यक्ष समीर बनकर,जिल्हा चिटणीस महादेव पाटील,कुणबी समाज अध्यक्ष महादेव पाटील,सचिव महेश पवार,सरपंच उमेश पवार,मुंबई अध्यक्ष महेंद्र टिंगरे,माजी सभापती बबन मनवे,युवक अध्यक्ष फैसल गीते, मयूर खैरे,महिला अध्यक्षा मीना टिंगरे,जेष्ठ नेते राजाराम गावडे, युवा नेते अनिल काप,मतदार संघ अध्यक्षा सोनल घोले,समाज नेते अंकुश खडस,लहू तुरे,राजाराम तिलटकर,माजी नगराध्यक्ष सुनिल शेडगे,गण अध्यक्ष सतीश शिगवण,माजी सभापती करुणा काप,संतोष नाना सावंत,किरण पालांडे,गजानन पाखड,अनिल टिंगरे,महेश घोले आदी मान्यवर समाज नेते मंडळी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचलन समाजसेवक सचिव महेश पवार यांनी केले.पानवे येथील पश्चिम विभाग कुणबी समाज संघटनेची उभारण्यात आलेली समाज वास्तूचा पाठपुरावा केलेले महेश पवार,इमारतीचे सुबक आणि सुंदर बांधकाम करणारे मयूर खैरे आणि त्यांचे सहकारी पांडुरंग मेंदाडकर यांनी केलेल्या कामाचे खासदार सुनिल तटकरे यांनी गोड शब्दात कौतुक केले.