बाजारातील महागडे Toner वापरण्याची भासणार नाही आवश्यकता! 'या' पद्धतीने घरीच तयार करा स्वस्तात मस्त होममेड टोनर
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा कायमच हायड्रेट आणि मुलायम ठेवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याचा सल्ला कायमच दिला जातो. थंड वारे आणि वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे त्वचा खूप जास्त निस्तेज आणि कोरडी होऊन जाते. चेहऱ्यावर वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी आणि त्वचा मऊ मुलायम राहण्यासाठी मेकअप करण्याआधी टोनर लावले जाते. टोनर लावल्यामुळे त्वचेवर ओपन पॉर्स बंद होतात आणि त्वचा घट्ट राहते. पण त्वचेची काळजी घेण्यासाठी कायमच बाजारातील महागड्या स्किन केअरचा आणि टोनरचा वापर केला जातो. बाजारात मिळणाऱ्या टोनर आणि इतर प्रॉडक्टमध्ये केमिकलयुक्त घटक वापरले जातात, ज्यामुळे काहीकाळ त्वचा चांगली दिसते. पण कालांतराने त्वचेमध्ये अनेक बदल दिसू लागतात. आज आम्ही तुम्हाला घरगुती पदार्थांचा वापर करून टोनर बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया सविस्तर. (फोटो सौजन्य – istock)
सकाळी उठल्यानंतर अनेकांना ग्रीन टी पिण्याची सवय असते. ग्रीन टी प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवात चांगली होत नाही. ग्रीन टी मध्ये असलेले घटक संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आहेत. ग्रीन टी टोनर बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात ग्रीन टी टाकून काहीवेळ उकळवा. त्यानंतर गॅस बंद करून पाणी थंड करा. तयार केलेले पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. दिवसभरातून दोन ते तीन वेळा टोनर चेहऱ्यावर स्प्रे करा. यामुळे त्वचेवर ताजेपणा जाणवेल आणि त्वचेवरील पोअर्स टाइट होण्यास मदत होईल.
बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे टोनर उपलब्ध आहेत. पण केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. टोनर बनवण्यासाठी सर्वप्रथम, २ चमचे कोरफड जेल पाण्यात मिक्स करा. तयार केलेले मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून चेहऱ्यावर नियमित लावल्यास त्वचा कायमच हायड्रेट राहील. याशिवाय चेहऱ्यावर ताजेपणा टिकून राहील. कोरफड टोनर त्वचा कायमच हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते.
बऱ्याचदा चेहऱ्यावर जळजळ किंवा लालसरपणा वाढू लागतो. चेहऱ्यावर वाढलेला लालसरपणा कमी करण्यासाठी काकडी आणि गुलाब पाण्याचा वापर करून बनवलेले टोनर वापरावे. यासाठी काकडीच्या रसात गुलाब पाणी मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. सकाळ संध्याकाळ नियमित चेहऱ्यावर टोनर स्प्रे करा. काकडीमुळे त्वचेमधील उष्णता कमी होईल.






