अरे चाललंय तरी काय? आधी बदलापूर मग कल्याण आता...; बावीस वर्षीय नराधमाकडून सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
अलिबाग : राज्यात लहान मुलींवर लैंगिक अत्याचार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. बदलापूर कल्याणमधील घटना ताजी असतानाच आता मुरुडमध्ये सात वर्षाच्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराने रायगड जिल्हा हादरूने गेला आहे. सततच्या या घडणाऱ्य़ा गुन्ह्यांवर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुरुड तालुक्यातील एका गावात बावीस वर्षीय नराधमाने सात वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेने मुरुडसह अलिबाग तालुका हादरलं आहे. अद्याप आरोपी फरार असून रायगड पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.मुरुडमध्ये सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या घराजवळ असलेल्या समुद्रकिनारी नेवून तिच्यावर शाररिक अत्याचार केला आहे. याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या आईने रेवदंडा पोलिस ठाण्यात दिली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुरुड तालुक्यातील एका गावात दिनांक 27 डिसेंबर रोजी पीडित मुलगी ही तिचा भाऊ आणि बहीण यांच्यासोबत शौचास गेली होती. सदर ठिकाणी आरोपी याने येवून पिडीत मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहीत असताना तिचे अज्ञान असण्याचा फायदा घेवून तिला एकटीलाच समुद्र किनारी उभ्या केलेल्या एका बोटीत नेऊन तिच्यावर शारीरीक अत्याचार केला. याबाबत रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या नराधमाने समुद्र किनारी असलेल्या एका होडीत नेऊन तिच्यावर अत्याचार केले. पिडीत मुलीने याबाबत कोणालाही काही सांगू नये म्हणून तिला धमकावण्यात आलं. तसेच घरी जावून होडीचा गळ गुप्तांगला लागला आहे असे सांगण्यास भाग पाडले. तिच्या हातावर मारहाण केल्याच्या खुणा देखील आहेत. सदर प्रकरणात मुरुड पोलिसांचा तपास सुरु आहे. बावीस वर्षीय आरोपीवर यापूर्वी ही पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जिल्ह्यातून केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये देखील अल्प वयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रकार घडला होता. अशा घटनेतील आरोपी यांना शासनाने कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि हा खटला जलदगतीने न्यायलायत चालविण्याची मागणी सामजिक कार्यकर्ती रुपाली पेरेकर यांनी केली आहे.या प्रकरणाची माहिती मिळताच मुरुड पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठवून सदर पीडित मुलीची चौकशी करण्याची सूचना केली आहे. तसेच तिला पोलिस विभागाकडून सर्वतोपरी न्याय मिळणार असल्याची ग्वाही रायगड जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी सांगितलं आहे.आधी बदलापूर , मग कल्याण आणि आता मुरुडमध्ये लहानग्या मुलीवर झालेला लैंगिक अत्याचार या सगळ्यामुळे आता लहान मुलाींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यांच्या अज्ञान असण्याचा गैरफायदा घेणाऱ्या नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. या सततच्या घडणाऱ्या घटनांवर राज्याभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.