फोटो सौजन्य- प्रतिनिधी
सुनिल राजभर /रायगड: माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन कार्यक्षेत्र असलेल्या माणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापती पदी भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य महेश सुर्वे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण १८ सदस्य आहेत. माजी सभापती रमेश मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर सभापती पदाची निवडणूक दि. १६ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचे प्राधिकृत अधिकारी अमोल निरडे यांच्या अधिपत्याखाली घेण्यात आली. या निवडणुकीत सभापती पदासाठी महेश सुर्वे यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केला होता. यावेळी महेश सुर्वे हे बिनविरोध निवडून आल्याचे निवडणुकीचे प्राधिकृत अधिकारी अमोल निरडे यांनी जाहीर केले.
यावेळी संस्थेच्या निवडणुकीसाठी अल्लाउद्दीन उमर सनगे, हसनमिया अ. लतीफ बंदरकर, नरेश लक्ष्मण दळवी, दिलीप विनायक उतेकर, अँड. कौस्तुभ विद्याधर धामणकर, गौरी भाऊ पयेर, नाझनीन अस्लम राऊत, सुषमा लीलाधर रिकामे, विनायक तुकाराम गिजे, स्वप्नील सीताराम दसवते, चंद्रकांत विष्णू गोरेगावकर, संतोष गोविंद मेथा, अंकुश गोळे हे संचालक उपस्थित होते. तसेच यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अस्लमभाई राऊत, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रशांत शिंदे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन अधिकारी, माजी उपसरपंच स्वप्नील सकपाळ, भाजपा तालुकाध्यक्ष गोविंद कासार, माजी भाजपा अध्यक्ष संजयआप्पा ढवळे, परशुराम पवार, शेकाप सरपंच दिनेश गुगळे, शेकाप माजी सरपंच विलास गोठल, माजी उपसरपंच अमोल मोहिते, शेकाप नेते निजाम फोपलूनकर, बाळकृष्ण अंबुर्ले, नामदेव शिंदे, सरपंच बळीराम खाडे, बाळा ढमाले,भाजपा सरचिटणीस बाबुराव चव्हाण,भाजपा उपाध्यक्ष महादेव कदम, शेकाप राजेश कासारे, भाजपा युवा सरचिटणीस अमोल पवार, मंदार मढवी आदी उपस्थित होते.
या निवडणुकीचे खरे किंगमेकर भाजप युवमोर्चा अध्यक्ष निलेश थोरे ठरले. सभापती पदाची निवड झाल्यानंतर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करीत एक प्रकारे दिवाळीच साजरी केली. सभापती महेश सुर्वे यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.