Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain News : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! माथेरानची मिनी ट्रेन बंद, काय आहे प्रशासनाचा निर्णय

मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. त्यामुळे माथेरान स्थानिक प्रशासनाने मिनी ट्रेनबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 26, 2025 | 06:33 PM
Maharashtra Rain News :  पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! माथेरानची मिनी ट्रेन बंद, काय आहे प्रशासनाचा निर्णय
Follow Us
Follow Us:

कर्जत/ संतोष पेरणे : पर्यटकांची लाडकी मिनी ट्रेन 1 दिवसासाठी बंद ठेवण्यात आली आहे. हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट दिल्यानंतर रात्रभर मुसळधार पाऊस झाला आहे. मात्र या काळात नेरळ माथेरान मिनी ट्रेन मार्गावर दरडी कोसळून कोणताही धोका पत्करावा लागू नये यासाठी नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन बंद ठेवण्यात आली आहे.स्थानिक रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेनच्या दोन्ही फेऱ्या रद्द करण्यात आल्याने पर्यटकांची नाराजी व्यक्त केली.

सध्या मे महिन्याची सुट्टी सुरू असून थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान मध्ये पर्यटकांची रीघ लागली आहे. डोंगरावरील माथेरान येथे जाण्यासाठी नॅरोगेज वर चालविली जाणारी मिनी ट्रेन असून या मिनी ट्रेन मधून प्रवास करण्याची संधी मिळावी म्हणून पर्यटक तासन् तास थांबून राहतात.नेरळ माथेरान नेरळ मार्ग २१ किलोमिटर लांबीचा असून या मार्गावर १५ किलोमीटर लांबीचा मार्ग हा डोंगराळ भागातून जातो.त्यामुळे या रेल्वे मार्गावर दरडी पावसाळयात कोसळण्याची शक्यता असल्याने ब्रिटिश काळापासून नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन पावसाळ्यात बंद ठेवली जाते.त्यामुळे दरवर्षी जून महिन्यात नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन बंद ठेवली जाते आणि ऑक्टोबर महिन्यात पुन्हा एकदा मिनी ट्रेन पर्यटकांच्या दिमतीला येते.मात्र यावर्षी मे महिन्यात अवकाळी पाऊस सुरू झाला आणि पर्यटकांनी धुक्यातून वाट काढणारी मिनी ट्रेन मधून प्रवास करण्याचा आनंद पर्यटकांनी मागील २० दिवस घेतला आहे.

Mansoon Update : टेकडीवरील खोदकाम बेतलं स्थानिकांच्या जीवावर ; गावकऱ्यांच्या घरात चिखलाचा खच

परंतु यावर्षी २६ मे रोजी मौसमी पावसास सुरुवात झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केला आहे.त्याप्रमाणे नेरळ माथेरान भागात रात्रभर मुसळधार पाऊस झाला आहे. त्यावेळी अती मुसळधार पाऊस होण्याची शक्यता जाहीर करण्यात आली आहे.त्यात सर्वत्र मुसळधार पावसामुळे धुकेमय वातावरण निर्माण झाले असून माथेरान डोंगरात तर प्रचंड प्रमाणात धुके असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नेरळ रेल्वे स्थानक आणि माथेरान रेल्वे स्थानक यांच्याकडून तसेच मिनी ट्रेनचे मार्गाची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या आयडबलू विभागाने २६ मे रोजी नेरळ येथून माथेरान साठी जाणाऱ्या सकाळच्या दोन्ही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.सकाळी आठ वाजून ५० मिनिटांनी आणि नंतर दहा वाजून २५ मिनिटे या वेळेवर माथेरान साठी जाणाऱ्या दोन्ही गाड्या सकाळी रद्द करण्यात आल्या.तर माथेरान येथून नेरळ साठी निघणाऱ्या दोन्ही गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.त्याचा परिणाम माथेरानला जाण्यासाठी आलेले आणि माथेरान मधून आपल्या घरी परतण्याच्या तयारीत असलेले पर्यटक यांची गैरसोय झाली.

Mansoon Update : प्रशासनाचा हलर्जीपणा अन् नदीला पूर, गावकऱ्यांनी व्यक्त केला संताप

अनिल सानप, आयडबलू विभाग
घाटात दोन दिवसांपासून पाऊस आहे,त्यात धुके देखील प्रचंड असल्याने आम्ही स्थानिक प्रशासनाने निर्णय घेवून प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेवून मिनी ट्रेन रद्द करण्यात आली.

 

 

Web Title: Important news for tourists matherans mini train closed what is the administrations decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 06:25 PM

Topics:  

  • Karjat
  • mansoon
  • Matheran
  • Rain News
  • Rain Update

संबंधित बातम्या

Raigad News: आश्रमशाळेच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप; चौकशीची मागणी जोर धरणार?
1

Raigad News: आश्रमशाळेच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप; चौकशीची मागणी जोर धरणार?

Torrent Project : ‘अडाणी शेतकरी’ शब्दावरून वाद पेटला… Karjat मध्ये भूसंपादन सुनावणीत मोठा राडा! थेट जनसुनावणी बंद पाडली
2

Torrent Project : ‘अडाणी शेतकरी’ शब्दावरून वाद पेटला… Karjat मध्ये भूसंपादन सुनावणीत मोठा राडा! थेट जनसुनावणी बंद पाडली

Neral News: नळाच्या पाण्यात चक्क साप! नेरळ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्यावर प्रश्नचिन्ह; नागरिकांमध्ये खळबळ
3

Neral News: नळाच्या पाण्यात चक्क साप! नेरळ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्यावर प्रश्नचिन्ह; नागरिकांमध्ये खळबळ

कोकणसह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
4

कोकणसह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.