संतोष पेरणे / कर्जत : कर्जत तालुक्यातील किरवली गावाच्या मागे असलेल्या टेकडीवर अनेक महिने खोदकाम सुरू आहे.त्या खोदकामाबद्दल स्थानिक रहिवाशी यांनी महसूल विभागाला पत्र देवून माती वाहून येण्याची भीती व्यक्त केली होती.मात्र महसूल विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने किरवली गावातील अनेकांचे घरामध्ये पाणी आणि माती शिरली आहे.दरम्यान या नुकसानीची माहिती घेण्यासाठी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी आणि तलाठी पोहचले आहेत.
कर्जत तालुक्यातील किरवली महसूल गावाच्या हद्दीमध्ये टेकडी खोदण्याचे काम चालू आहे. गावाच्या वरच्या बाजूला पोकलन मशीनचे साहाय्याने खोदकाम केले जात असताना ते खोदकाम तत्काळ बंद करावे अशी मागणी या गावातील ग्रामस्थांनी महसूल विभागाला लेखी पत्र देवून केली होती. किरवली गावाच्या मागे डोंगर पोखरून रस्ते बनवणे आणि जमीन सपाटीकरण करण्याची कामे केली जात होती. याच परिसरात २००५ मध्ये डोंगर (दरड) कोसळला होता आणि त्या भुस्खनन मध्ये घरांचे मोठे नुकसान झाले होते.त्यामुळे त्या भागात कोणतेही प्रकारचे खोदकाम करण्यास परवणागी देवू नये अशी मागणी करणारे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले होते.त्या अर्जावर दीपक सोणावळे,प्रकाश सोनवले,शरद गायकवाड, विजया सोणावले,रंजना सोनावळे, नीलिया गायकवाड, सुवर्णा गायकवाड,किरण गायकवाड, कल्पेश गायकवाड यांच्या सह्या आहेत.मात्र प्रशासनाने त्या अर्जकडे दुर्लक्ष केल्याने डोंगराची माती येणाऱ्या पहिल्याच पावसात खाली आली असून अनेकांचे घरामध्ये ही माती गेली आहे.
स्थानिक रहिवाशी यांनी गावाच्या मागील बाजूस असलेल्या डोंगराचे खोदकाम चालू असल्यामुळे गावातील वस्ती मध्ये जिवीतहानी होवू शकते.तरी तेथे एका विकासकाने बांधकाम करण्यासाठी डोंगर फोडून तयार केलेला मातीचा भराव वाहून खाली आला आहे. मातीचा भराव पाण्याच्या प्रवाहामध्ये येऊन वस्तीमध्ये साचले आहे ही माहिती मिळताच त्या भागाची पाहणी करण्यासाठी तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांनी आदेशाने मंडळ वैशाली पाटील,तलाठी वैशाली मांन्टे, तलाठी आकाश काळे तसेच कोतवाल सुनील गायकवाड यांनी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. किरवलीचे ग्रामस्थ राहुल गायकवाड, रोशन गायकवाड, शैलेंद्र जाधव, कल्पेश गायकवाड,हे यावेळी उपस्थित होते.या पाण्यासोबत आलेल्या माती मुळे किरवली गावातील ३४ हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे.
मान्सून यावर्षी लवकरच आगमन केलं असून यंदा मे महिन्यातच पावसाला दमदार सुरूवात झाली आहे.त्यात ढग फुटी सदृश पाऊस झाल्यानंतर पहिल्याच पावसात तालुक्यातील सर्व नद्यांना पूर आले आहेत.कर्जत तालुक्यात उन्हाळयात कोरडी असलेली चिल्हार नदी एका दिवसाच्या पावसात दुथडी भरून वाहत आहे.उन्हाळयात कोरडया नदीमध्ये पाण्याचा साठा असावा यासाठी चिल्हार नदीमध्ये अंत्राट वरेडी गावाच्या हद्दीत असलेल्या के. टी.बंधारा बांधण्यात आला होता.या बंधाऱ्यांच्या लोखंडी प्लेटी पावसाळा सुरू होण्याची लक्षणे असताना काढण्यात आलेले नव्हते.त्याचा फटका स्थानिक ग्रामस्थांना बसला आहे.बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेट काढण्यात आल्या नसल्याने नागपूरचे पाणी थेट गावामध्ये घुसले आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात मोठी पूरपरिस्थिती निर्माण झाली.त्याचवेळी शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचे नुकसान तर झालेच पुरामुळे नदीकाठावरील घरांना धोका निर्माण झाला आहे.