Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News : रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता! माथेरान मिनी ट्रेन फाटकाजवळ खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनचालक हैराण

कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील नेरळ येथील माथेरान मिनी ट्रेन रेल्वे फाटकाजवळ मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे पावसाळ्यात परिस्थिती अधिक बिकट झाली असून तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 01, 2026 | 11:55 AM
रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता! माथेरान मिनी ट्रेन फाटकाजवळ खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनचालक हैराण

रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता! माथेरान मिनी ट्रेन फाटकाजवळ खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनचालक हैराण

Follow Us
Follow Us:
  • नेरळ रेल्वे फाटक परिसरातील रस्ता धोकादायक
  • रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागावर नागरिकांचा संताप
  • पावसामुळे वाढली खड्ड्यांची समस्या
  • कर्जत-कल्याण मार्गावर तातडीने दुरुस्तीची मागणी
कर्जत तालुक्यातील महत्त्वाच्या कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील नेरळ येथील माथेरान मिनी ट्रेनच्या रेल्वे फाटकाजवळ रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. फाटक परिसरात मोठमोठे आणि खोल खड्डे पडल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यामुळे ही परिस्थिती आणखी गंभीर बनली असून अपघाताचा धोका वाढला आहे. एकंदरित काय तर…रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सध्या नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सेवा बंद असली तरी रेल्वे फाटकावरील रस्त्याची दुरवस्था कायम आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने फाटक परिसरात सिमेंट काँक्रीटीकरण करून रस्ता दुरुस्त करण्याची गरज असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून केला जात आहे. परिणामी, मागील वर्षाप्रमाणे यंदाही या भागात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

Matheran News : माथेरानच्या शार्लोट तलावात कोट्यवधींचा गैरव्यवहार? गाळ न काढताच निधी लाटण्याचा आरोप

नेरळ पेट्रोल पंपाजवळून जाणाऱ्या या राज्यमार्गावर माथेरान मिनी ट्रेनची नॅरोगेज मार्गिका आहे. रेल्वे फाटक परिसरातील डांबरी रस्ता पावसाळ्यापूर्वीच खराब झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेत दुरुस्ती न केल्याने पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांचा आकार आणि खोली अधिक वाढली आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांना मोठी कसरत करत मार्ग काढावा लागत आहे. शेषतः रेल्वे फाटक परिसरात वाहनांचा वेग अत्यंत कमी झाला असून दोन्ही बाजूंनी वाहने सावधपणे पुढे सरकत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. खोल खड्डे चुकवताना वाहनचालकांना मोठा धोका पत्करावा लागत असून अपघाताची भीतीही व्यक्त केली जात आहे.

उन्हाळ्यापासूनच या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र, रेल्वे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही यंत्रणांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याची नाराजी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली असून आता तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

मानवाधिकार कार्यकर्ते गोरख शेप यांनीही रेल्वे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन देऊन पावसाचा जोर कमी होताच रेल्वे फाटक परिसरातील खड्डे तातडीने भरावेत आणि रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनीही या मार्गाची तातडीने दुरुस्ती करून सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

Matheran Mini Train : पर्यटकांचा लाडका प्रवास थांबला! आजपासून माथेरानची मिनी ट्रेन पावसाळी सुट्टीवर; १५ ऑक्टोबरपर्यंत सेवा बंद

Web Title: Karjat kalyan highway matheran mini train crossing potholes neral road condition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • Karjat
  • Matheran
  • neral

संबंधित बातम्या

Raigad News: माथेरानच्या शार्लोट लेकमधील गाळ नाल्यात सोडल्याचा आरोप; पर्यावरणाच्या नुकसानीची भीती, नागरिक नाराज
1

Raigad News: माथेरानच्या शार्लोट लेकमधील गाळ नाल्यात सोडल्याचा आरोप; पर्यावरणाच्या नुकसानीची भीती, नागरिक नाराज

Matheran News: ‘माथेरानची सुपीक माती डोंगराखाली का सोडली?’ शाळकरी मुलाचा सवाल, ‘आपली लाल सुपीक माती वाचवणार कोण?’
2

Matheran News: ‘माथेरानची सुपीक माती डोंगराखाली का सोडली?’ शाळकरी मुलाचा सवाल, ‘आपली लाल सुपीक माती वाचवणार कोण?’

Karjat News: बाबो! पाषाणेतील गृहसंकुलात तब्बल ११ फुटांचा अजगर, रहिवाशांमध्ये उडाली खळबळ
3

Karjat News: बाबो! पाषाणेतील गृहसंकुलात तब्बल ११ फुटांचा अजगर, रहिवाशांमध्ये उडाली खळबळ

आशियातील एकमेव असे हिल स्टेशन जिथे गाड्यांना नो एंट्री; इंग्रजांनी शोधले होते महाराष्ट्रातील हे सुंदर ठिकाण
4

आशियातील एकमेव असे हिल स्टेशन जिथे गाड्यांना नो एंट्री; इंग्रजांनी शोधले होते महाराष्ट्रातील हे सुंदर ठिकाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.