Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News : कर्जत–नेरळ–माथेरान मार्गावर मोठा अपघात टळला; मिनीबसचा गियर बॉक्स निकामी, ४५ प्रवाशांचे प्राण वाचले

कर्जत–नेरळ–माथेरान घाट मार्गावर मिनीबसचा गियर बॉक्स निकामी झाल्याने मोठा अपघात टळला आणि ४५ प्रवासी सुरक्षित बचावले.मिनीबसचे चालक नितीन जाधव यांनी प्रसंगावधान राखल्याने अनेक प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 01, 2026 | 03:04 PM
कर्जत–नेरळ–माथेरान मार्गावर मोठा अपघात टळला; मिनीबसचा गियर बॉक्स निकामी, ४५ प्रवाशांचे प्राण वाचले

कर्जत–नेरळ–माथेरान मार्गावर मोठा अपघात टळला; मिनीबसचा गियर बॉक्स निकामी, ४५ प्रवाशांचे प्राण वाचले

Follow Us
Follow Us:
  • कर्जत–नेरळ–माथेरान मार्गावर मोठा अपघात टळला
  • मिनीबसचा गियर बॉक्स निकामी
  • ४५ प्रवाशांचे प्राण वाचले
कर्जत: कर्जत येथून पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानसाठी सकाळी निघालेली मिनीबस घाटरस्ता मध्ये बंद पडली. 45 प्रवासी प्रवास करीत असलेल्या मिनिबसचे गियर बॉक्स खराब झाल्याने गाडी रस्त्याच्या कडेला लावावी लागली. मिनीबसचे चालक नितीन जाधव यांनी प्रसंगावधान राखल्याने अनेक प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.

कर्जत एसटी आगारातून कर्जत नेरळ माथेरान अशी मिनीबस सकाळी नेहमीप्रमाणे माथेरान येथे जाण्यास निघाली. सकाळी सव्वा आठ वाजता निघालेली मिनीबस कर्जत येथून निघाली आणि नेरळ येथे वेळेवर पोहचली. सकाळची वेळ असल्याने या 30 सीट वाहून नेण्याची क्षमता असलेल्या मिनीबस मध्ये तब्बल 45 प्रवासी प्रवास करीत होते. नेरळ येथून माथेरान घाट रस्त्याने ही मिनीबस प्रवाशांना घेऊन पुढे जात असताना जुन्मापट्टी येथील चढाव पार केल्यावर गाडीचे गियर पडले जात नसल्याचे चालक नितीन जाधव यांच्या लक्षात आले.

Sambhajinagar Municipal Corporation Revenue: संभाजीनगर मनपाच्या तिजोरीत ४५० कोटींचा खडखडाट! वसुलीचा नवा विक्रम

त्या ठिकाणी चढाव पूर्ण केल्यावर काही अंतर पुढे नेवून चालक जाधव यांनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यावेळी अचानक गाडी थांबल्याने प्रवासी देखील घाबरले.प्रवाशांनी तत्काळ उतरावे अशी सूचना चालक करीत असल्याने सर्व प्रवासी खाली उतरले,त्यावेळी गाडी मध्ये काय बिघाड झाला आहे याची माहिती प्रवाशांना कळली.त्यामुळे दैव बलवत्तर असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली.

जुम्मापट्टी येथील वळणाचा तीव्र चढाव पार करून पुढे मिनीबस थांबल्याने मोठा अनर्थ टळला आहे.त्यात माथेरान येथून नेरळ कडे परत येताना मिनिबसचे गियर बॉक्स मध्ये बिघाड झाली असती तर मोठा अपघात नेरळ माथेरान घाटात राज्य परिवहन महामंडळाच्या मिनीबस गाडीला होऊ शकला असता.त्याचवेळी घाटात अनेक ठिकाणी तीव्र चढाव आहेत आणि त्या ठिकाणी गाडी बंद पडली असती तर देखील मोठा अनर्थ घडला असतात.मात्र चालकाच्या प्रसंगावधान यामुळे मिनीबस मधून प्रवास करणाऱ्या 45 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.

चालकाला गाडीमध्ये बिघाड झाल्याचे कळल्यावर त्यांनी तत्काळ गाडी धोक्याच्या बाहेर आल्यावर थांबवली,त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.शासनाने दोन मिनीबस घेण्याचे जाहीर केले आहे,त्यासाठी वेगवेगळ्या कंपनीच्या मिनीबस माथेरान घाटात चाचणी साठी आणल्या गेल्या आहेत.यापूर्वी दोन वेळा मिनी बस चे चाचणी झाली आहे,पण नवीन गाड्यांची खरेदी शासनाने केलेली नाही.शासनाने नवीन गाड्या खरेदी करून माथेरान येथे येणारे प्रवासी आणि स्थानिकांची गैरसोय टाळावी, अशी प्रतिक्रिया प्रवासी नितीन सावंत यांनी दिली.

थिसीससाठी निवासी डॉक्टरांकडे तीन लाख रुपयांची मागणी, आवाज उठवणाऱ्या डॉक्टरांना देण्यात आली नापास करण्याची धमकी

Web Title: Karjat neral matheran minibus gearbox failure 45 passengers safe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • Karjat
  • Matheran
  • neral

संबंधित बातम्या

Raigad News: माथेरानच्या शार्लोट लेकमधील गाळ नाल्यात सोडल्याचा आरोप; पर्यावरणाच्या नुकसानीची भीती, नागरिक नाराज
1

Raigad News: माथेरानच्या शार्लोट लेकमधील गाळ नाल्यात सोडल्याचा आरोप; पर्यावरणाच्या नुकसानीची भीती, नागरिक नाराज

Matheran News: ‘माथेरानची सुपीक माती डोंगराखाली का सोडली?’ शाळकरी मुलाचा सवाल, ‘आपली लाल सुपीक माती वाचवणार कोण?’
2

Matheran News: ‘माथेरानची सुपीक माती डोंगराखाली का सोडली?’ शाळकरी मुलाचा सवाल, ‘आपली लाल सुपीक माती वाचवणार कोण?’

Karjat News: बाबो! पाषाणेतील गृहसंकुलात तब्बल ११ फुटांचा अजगर, रहिवाशांमध्ये उडाली खळबळ
3

Karjat News: बाबो! पाषाणेतील गृहसंकुलात तब्बल ११ फुटांचा अजगर, रहिवाशांमध्ये उडाली खळबळ

आशियातील एकमेव असे हिल स्टेशन जिथे गाड्यांना नो एंट्री; इंग्रजांनी शोधले होते महाराष्ट्रातील हे सुंदर ठिकाण
4

आशियातील एकमेव असे हिल स्टेशन जिथे गाड्यांना नो एंट्री; इंग्रजांनी शोधले होते महाराष्ट्रातील हे सुंदर ठिकाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.