Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: पनवेलमध्ये देशातील पहिली ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’; ७ हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार!

Panvel Marathon: देशातील पहिल्या 'खारघर हिल महापौर मॅरेथॉन'ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. खारघरच्या निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या मॅरेथॉनला एआयएमएस प्रमाणपत्र मिळाल्याने स्पर्धेला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 22, 2026 | 03:00 PM
Raigad News: पनवेलमध्ये देशातील पहिली ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’; ७ हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार!

Raigad News: पनवेलमध्ये देशातील पहिली ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’; ७ हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार!

Follow Us
Follow Us:
  • खारघर हिल मॅरेथॉनमध्ये ३, ५, १०, २१ आणि ४२ किलोमीटर अशा पाच गटांत स्पर्धा होणार आहे.
  • ‘सुपरकॉप’ आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश सहभागी होणार असून अभिनेते अंकुश चौधरी मॅरेथॉनचे ब्रँड ॲम्बेसिडर आहेत.
  • मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर २३ ऑगस्टला पहाटे ४ ते सकाळी ११ वाजेपर्यंत खारघर परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
पनवेल: पनवेल महानगरपालिकेतर्फे २३ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्पर्धेत प्रसिद्ध ‘सुपरकॉप’ आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश सहभागी होणार असून मराठी अभिनेते अंकुश चौधरी हे मॅरेथॉनचे बँड ॲम्बेसिडर आहेत. देश-विदेशातील ७हजारांहून अधिक धावपटूंनी स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे.

Raigad News: महाडमध्ये SIR चा पहिला टप्पा पूर्ण; 45 हजार 463 मतदारांची गणना पत्रे अद्याप गायब

खारघरच्या निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या मॅरेथॉनला एआयएमएस प्रमाणपत्र मिळाल्याने स्पर्धेला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे. महापौर नितीन पाटील आणि सभागृह नेते प्रकाश विनेदार यांच्या संकल्पनेतून १०० दिव्यांग धावपटूंनाही स्पर्धेत सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रासोबतच समावेशकतेचा संदेशही या उपक्रमातून दिला जाणार आहे. दरम्यान, मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर २३ ऑगस्ट रोजी पहाटे ४ ते सकाळी ११ या वेळेत खारघर परिसरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्या माहितीनुसार, ३, ५, १०, २१ आणि ४२ किलोमीटर अशा पाच गटांत स्पर्धा होणार आहे. सर्व गटांचा प्रारंभ व समाप्ती सेंट्रल पार्क येथे होईल.  (फोटो सौजन्य – AI Created) 

विविध गटांतील धाव ‘या’ भागांतून होणार

३ व ५ किलोमीटरची धाव गुरुद्वारा, जे. कुमार सर्कल, बी. डी. सोमाणी चौक आणि विनायक सेठ चौक मार्गे होईल.

तर १०, २१ आणि ४२ किलोमीटरचे मार्ग इस्कॉन मंदिर, ग्रामविकास भवन, उत्सव चौक, बेलपाडा, RBI मेट्रो स्टेशन, फणसवाडी टेकडी, टाटा हॉस्पिटल, तळोजा जेल आणि पापडीचा पाडा या भागांतून जाणार आहेत.

Amravati News: ज्वारी-बाजरीला उतरती कळा! अमरावतीत सोयाबीन-कापसाचे क्षेत्र; मक्याची १५१ टक्के पेरणी

आरोग्य आणि क्रीडा संस्कृतीला चालना

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी काही मार्गांवर एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार असून अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना वाहतूक निबंधातून वगळण्यात आले आहे. मॅरेथॉनमुळे शहरात आरोग्य व क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल, असा विश्वास महापौर नितीन पाटील, आयुक्त मंगेश चितळे, मुख्य प्रवर्तक परेश ठाकूर आणि विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Kharghar hill mayor marathon 2026 over 7000 runners to participate in panvels mega marathon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेंची ‘सारेगमप’मध्ये दमदार कमबॅक! नव्या पिढीच्या सुरांचा घेणार वेध
1

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेंची ‘सारेगमप’मध्ये दमदार कमबॅक! नव्या पिढीच्या सुरांचा घेणार वेध

Cheque Book Rules Change: चेकबुकबाबत मोठी बातमी! जुने चेकबुक होणार बंद? खातेदारांना करावा लागणार ‘हा’ बदल
2

Cheque Book Rules Change: चेकबुकबाबत मोठी बातमी! जुने चेकबुक होणार बंद? खातेदारांना करावा लागणार ‘हा’ बदल

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये पावसाचा लपंडाव; ५०२ मिमी पावसाची नोंद, खरीप पिकांना दमदार सरींची प्रतीक्षा
3

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये पावसाचा लपंडाव; ५०२ मिमी पावसाची नोंद, खरीप पिकांना दमदार सरींची प्रतीक्षा

Sangli News: सांगलीच्या ‘माडग्याळ’ मेंढीला राष्ट्रीय मान्यता; देशी मेंढीची स्वतंत्र जात म्हणून नोंद
4

Sangli News: सांगलीच्या ‘माडग्याळ’ मेंढीला राष्ट्रीय मान्यता; देशी मेंढीची स्वतंत्र जात म्हणून नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.