Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: महाड MIDC मध्ये विषारी वायूगळती; दोन कामगारांचा मृत्यू, कंपनीविरोधात ग्रामस्थांचा संताप

महाड एमआयडीसीतील विषारी वायूगळतीच्या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थ संतप्त झाले असून कंपनीच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत मृतांच्या कुटुंबीयांना योग्य भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 17, 2026 | 01:58 PM
Raigad News: महाड MIDC मध्ये विषारी वायूगळती; दोन कामगारांचा मृत्यू, कंपनीविरोधात ग्रामस्थांचा संताप

Raigad News: महाड MIDC मध्ये विषारी वायूगळती; दोन कामगारांचा मृत्यू, कंपनीविरोधात ग्रामस्थांचा संताप

Follow Us
Follow Us:
  • महाड एमआयडीसीतील विषारी वायूगळतीच्या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे.
  • ग्रामस्थांनी कंपनीच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत कंपनी बंद करण्याची मागणी केली आहे.
  • मृत कामगारांच्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त भरपाई मिळावी यासाठी तातडीने बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महाड: महाड एमआयडीसीतील इंडो अमाईन्स कंपनीत शनिवारी सायंकाळी झालेल्या विषारी वायू गळती दुर्घटनेत दोन कामगारांचा बळी गेला. घटनेचे वृत्त समजताच रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य तथा मंत्री भरतशेठ गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी रविवारी घटनास्थळी भेट देत पोलीस प्रशासन, कंपनी व्यवस्थापन व ग्रामस्थांसह संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. कंपनी प्रशासनाला मृतांच्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची सूचना दिल्या आणि त्या स्वरूपाची तातडीची बैठक लवकरच आयोजित करण्यास सांगितले.

Nashik Potholes: नाशिकमध्ये ठाकरे गटाचा एल्गार! ‘मनपावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’; संजय राऊतांचा प्रशासनावर हल्लाबोल

स्थानिक आमदार तथा कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या अनुपस्थितीत विकास गोगावले यांनी तत्काळ पोलीस प्रशासन व अधिकाऱ्यांशी चर्चा करून मदतकार्याची माहिती घेतली. संतप्त ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी वातावरण शांत केले. मृत कामगारांच्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी तातडीने बैठक घेण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय सुरक्षेत हलगर्जीपणा करणाऱ्या कंपन्यांवर कठोर निर्बंध लादण्याचा इशाराही त्यांनी दिला.  (फोटो सौजन्य – AI Created) 

परिसरातील ग्रामस्थ झाले आक्रमक

या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून कंपनीच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. विकास गोगावले यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पोलीस प्रशासनाशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला. मृत कामगारांच्या कुटुंबीयांची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेत, त्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळावी यासाठी बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या, त्याचाप्रमाणे अशा प्रकारच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या कंपन्यांवर कठोर निबंध घालण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वायूच्या प्रकाराबाबत संभ्रम

सुरुवातीला एचसीएल वायूची गळती झाल्याची माहिती दिली. मात्र हा वायू एचसीएल नसल्याचा दावा ग्रामस्थांनी असून कंपनीकडून दिशाभूल केली जात असल्याचे बोलले जात आहे. अशा चुकीच्या प्राथमिक माहितीमुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांना विलंब झाला का? याची चौकशीची मागणी होत असून जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचा आरोपही केला. महाडचे माजी उपसभापती चंद्रकांत बुवा जाधव आणि पंचायत समिती सदस्य मयूर जाधव यांनी कंपनीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. कंपनीत यापूर्वीही दुर्घटना झाल्याचा दावा करत कंपनी बंद करण्याची मागणी करण्यात आली.

वाहतूक पोलिसांचा आता पालिकेला ‘अलर्ट’; कारणे शोधून उपाययोजना करण्याचे पोलिस आयुक्तांचे निर्देश

मृतदेह ताब्यात न घेण्याचा संतप्त ग्रामस्थांचा पवित्रा

ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कंपनी प्रशासनाने मृत कामगारांच्या कुटुंबीयांची जबाबदारी स्वीकारून योग्य भरपाईची हमी देईपर्यंत मृतदेह कंपनीच्या आवारातून ताब्यात घेणार नसल्याची भूमिका स्थानिक नेते सुभाष निकम यांनी घेतली. भविष्यात नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या अशा धोकादायक कंपन्या परिसरात चालू ठेवू नयेत, असा निर्धारही ग्रामस्थांनी व्यक्त केला.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mahad midc toxic gas leak two workers die villagers protest safety concerns raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • Mahad
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त
1

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात
2

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात

Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा
3

Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा

वसई-विरार महापालिकेविरोधात मनसेचे ‘भीक मांगो’ आंदोलन;स्मशानभूमी कंत्राटातील कथित गैरव्यवहाराचा आरोप
4

वसई-विरार महापालिकेविरोधात मनसेचे ‘भीक मांगो’ आंदोलन;स्मशानभूमी कंत्राटातील कथित गैरव्यवहाराचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.