Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: महाडकरांना मोठा दिलासा! 20 दिवसांत पर्यायी जलवाहिनीचे काम पूर्ण, शहराचा पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत

जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे सावित्री नदीच्या पुरात कुर्ला धरणाची मुख्य जलवाहिनी वाहून गेल्याने महाड शहरात गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली होती. मात्र अमृत 2 योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या पर्यायी जलवाहिनीचे काम अवघ्या 20 दिवसांत पूर्ण झाल्याने शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 01, 2026 | 02:26 PM
Raigad News: महाडकरांना मोठा दिलासा! 20 दिवसांत पर्यायी जलवाहिनीचे काम पूर्ण, शहराचा पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत

Raigad News: महाडकरांना मोठा दिलासा! 20 दिवसांत पर्यायी जलवाहिनीचे काम पूर्ण, शहराचा पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत

Follow Us
Follow Us:
  • सावित्री नदीच्या पुरात वाहून गेलेल्या कुर्ला धरणाच्या जलवाहिनीऐवजी पर्यायी जलवाहिनीचे काम अवघ्या 20 दिवसांत पूर्ण झाले.
  • नव्या जलवाहिनीद्वारे महाड शहरातील पाणीटंचाईग्रस्त भागात पुन्हा नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.
  • जलवाहिनी वाहून जाण्याच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
महाड: जुलै महिन्यातील अतिवृष्टीदरम्यान सावित्री नदीच्या महापुरात वाहून गेलेल्या कुर्ला धरणाच्या मुख्य जलवाहिनीमुळे महाड शहरावर ओढवलेले गंभीर पाणीसंकट अखेर दूर झाले असून अमृत २ योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या पर्यायी जलवाहिनीचे काम अवघ्या वीस दिवसांच्या अथक परिश्रमातून आणि युद्धपातळीवरील नियोजनातून २८ जुलै रोजी पूर्ण करण्यात आले. या नव्या जलवाहिनीद्वारे कुर्ला धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या शहरातील टंचाईग्रस्त भागात पुन्हा पाणीपुरवठा सुरू झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Raigad News: माथेरानला जाणार असाल तर ही बातमी आधी वाचा! रविवारी पहाटे 5 ते 8.30 वाजेपर्यंत घाटरस्ता बंद, पर्यटकांना मोठा फटका

दरम्यान, अतिवृष्टीनंतर झालेल्या नुकसानीच्या आढावा बैठकीत मंत्री भरतशेठ गोगावले यांनी जलवाहिनी वाहून जाण्यास कारणीभूत असलेल्या संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश देत पर्यायी जलवाहिनीचे काम कोणत्याही परिस्थितीत तातडीने पूर्ण करून नागरिकांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले होते. यापूर्वी सावित्री नदीपात्रातील गाळ उपसा चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्यामुळेच जलवाहिनी वाहून गेल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप गटाच्या नगरसेवकांनी केला होता.

संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली होती. या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच पर्यायी जलवाहिनीचे काम विक्रमी वेळेत पूर्ण झाल्याने शहरावरील मोठे पाणीसंकट टळले आहे. पाणीटंचाईच्या काळात नगराध्यक्ष सुनिल कविस्कर, उपनगराध्यक्ष संदीप जाधव तसेच सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्वखर्चाने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला.

कुर्ला धरणाची मुख्य जलवाहिनी वाहून गेली

जुलैच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीला महापूर आला होता, या पुरात नदीपात्रातून गेलेली आणि अनेक वर्षांपासून कार्यरत असलेली कुर्ला धरणाची मुख्य जलवाहिनी वाहून गेली. परिणामी, भर पावसाळ्यातही महाड शहरातील अनेक भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. प्रशासनाला टँकरद्वारे पाणीपुरथठा करण्याची वेळ आली, तर नागरिकांनाही मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.

ताप, डेंग्यू अन् लेप्टोची धास्ती! मुंबईत पावसाळी आजारांचा वाढता धोका; मान्सून ओपीडींमध्ये रुग्णांची गर्दी

जलवाहिनीची जोडणी यशस्वीरीत्या पूर्ण

या संकटाच्या पार्श्वभूमीवर रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या पुढाकारातून मंजूर झालेल्या अमृत २ योजनेअंतर्गत दादली गावापर्यंत आलेल्या जलवाहिनीला जोड देत दादली पूल-भोई घाट-गवळ आळी मार्गे पर्यायी जलवाहिनी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामाला सर्वोच्च प्राधान्य देत सलग वीस दिवस युद्धपातळीवर काम सुरू ठेवण्यात आले.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mahad water crisis ends alternative pipeline completed in 20 days water supply restored

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Govt Scheme: एकही रुपया जमा न करता सरकार देत आहे 25000 रुपये? कोणाला मिळणार फायदा? जाणून घ्या संपूर्ण माहिती
1

Govt Scheme: एकही रुपया जमा न करता सरकार देत आहे 25000 रुपये? कोणाला मिळणार फायदा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Jawali News: जावळीच्या सुपुत्रावर मोठी जबाबदारी! अंकुश कदम यांची शिवसेना प्रवक्तेपदी नियुक्ती
2

Jawali News: जावळीच्या सुपुत्रावर मोठी जबाबदारी! अंकुश कदम यांची शिवसेना प्रवक्तेपदी नियुक्ती

Chandrapur News: मुसळधार पाऊस कोसळूनही चंद्रपूरातील एकही मोठं धरण ओव्हरफ्लो नाही; १३ रस्ते वाहतुकीसाठी बंद
3

Chandrapur News: मुसळधार पाऊस कोसळूनही चंद्रपूरातील एकही मोठं धरण ओव्हरफ्लो नाही; १३ रस्ते वाहतुकीसाठी बंद

GST Collection Record: केंद्र सरकारची तिजोरी भरली! जीएसटी संकलनाने मोडले सर्व रेकॉर्ड्स; पाहा सरकारला किती झाला फायदा?
4

GST Collection Record: केंद्र सरकारची तिजोरी भरली! जीएसटी संकलनाने मोडले सर्व रेकॉर्ड्स; पाहा सरकारला किती झाला फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.