Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jawali News: जावळीच्या सुपुत्रावर मोठी जबाबदारी! अंकुश कदम यांची शिवसेना प्रवक्तेपदी नियुक्ती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून अंकुश कदम यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 01, 2026 | 03:16 PM
Ankush Kadam Shiv Sena Spokesperson,

Ankush Kadam Shiv Sena Spokesperson,

Follow Us
Follow Us:
  • नगरसेवक अंकुश बाबा कदम यांची शिवसेने पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती
  • माध्यमांशी समन्वय साधण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी
  • एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून अंकुश कदम यांच्याकडे पाहिले जाते
Jawali News: जावळी तालुक्याचे सुपुत्र आणि नवी मुंबई शिवसेना संपर्कप्रमुख व नगरसेवक अंकुश बाबा कदम यांची शिवसेने पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाची भूमिका प्रभावीपणे जनतेसमोर मांडण्यासाठी तसेच माध्यमांशी समन्वय साधण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जावळी तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नवी मुंबईमध्ये शिवसेना पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी अंकुश कदम यांनी सातत्याने काम केले आहे. संपर्कप्रमुख म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना एकत्र ठेवत पक्षवाढीसाठी प्रभावी नियोजन केले. विशेषतः नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यात आणि शिवसेनेला यश मिळवून देण्यासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.

Raj Thackeray: मंदिरातही श्रद्धेची लूट? सिद्धीविनायक, राम मंदिराचा उल्लेख करत राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून अंकुश कदम यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे पक्षाची अधिकृत भूमिका ठामपणे आणि प्रभावीपणे जनतेसमोर मांडण्याचे महत्त्वाचे काम आता ते सांभाळणार आहेत.

राजकीय घडामोडींवर पक्षाची ठाम बाजू मांडणे, विविध विषयांवर माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट करणे आणि पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचविणे या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि संघटन कौशल्याचा पक्षाला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास शिवसैनिकांकडून व्यक्त केला जात आहे.

‘बहुपत्नीत्वावर बंदी का नाही?’ सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला थेट सवाल, सरकारकडे मागितले उत्तर

जावळी तालुक्यातील सुपुत्रावर पक्षाने इतकी मोठी जबाबदारी सोपवल्यामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण असून शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिकांकडून अंकुश बाबा कदम यांच्यावर शुभेच्छांचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या निवडीमुळे जावळी तालुक्याच्या राजकीय क्षेत्रातही अभिमानाची भावना व्यक्त केली जात आहे.

“पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मझ्यावर जी जबाबदारी व जो विश्वास मझ्यावर दाखवला आहे.त्या विश्वासाने पक्ष शहरी तसेच ग्रामीण भागात मजबूत करण्यासाठी माझ्याकडून काम होईल.”

अंकुशबाबा कदम, शिवसेना प्रवक्ते

 

 

 

 

 

 

Web Title: Satara news jawali ankush kadam appointed as shiv sena spokesperson

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Marathi News
  • Satara
  • shivsena

संबंधित बातम्या

Chandrapur News: मुसळधार पाऊस कोसळूनही चंद्रपूरातील एकही मोठं धरण ओव्हरफ्लो नाही; १३ रस्ते वाहतुकीसाठी बंद
1

Chandrapur News: मुसळधार पाऊस कोसळूनही चंद्रपूरातील एकही मोठं धरण ओव्हरफ्लो नाही; १३ रस्ते वाहतुकीसाठी बंद

GST Collection Record: केंद्र सरकारची तिजोरी भरली! जीएसटी संकलनाने मोडले सर्व रेकॉर्ड्स; पाहा सरकारला किती झाला फायदा?
2

GST Collection Record: केंद्र सरकारची तिजोरी भरली! जीएसटी संकलनाने मोडले सर्व रेकॉर्ड्स; पाहा सरकारला किती झाला फायदा?

Raigad News: महाडकरांना मोठा दिलासा! 20 दिवसांत पर्यायी जलवाहिनीचे काम पूर्ण, शहराचा पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत
3

Raigad News: महाडकरांना मोठा दिलासा! 20 दिवसांत पर्यायी जलवाहिनीचे काम पूर्ण, शहराचा पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत

Aishwarya Narkar: भूमिका पडली महाग! “ही बाई मरत का नाही” म्हणत ऐश्वर्या नारकर यांना पडल्या शिव्या
4

Aishwarya Narkar: भूमिका पडली महाग! “ही बाई मरत का नाही” म्हणत ऐश्वर्या नारकर यांना पडल्या शिव्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.