Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News: 640 एकर वनजमिनीवर वाद! टोरंट प्रकल्पामुळे आदिवासींच्या उदरनिर्वाहावर संकट? पाली भागातील आदिवासी संतप्त

कर्जत तालुक्यातील पाली परिसरात टोरंट पॉवर एनर्जी स्टोरेज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पावरून वाद निर्माण झाला आहे. प्रकल्पासाठी वन विभागाची 640 एकर जमीन देण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 20, 2026 | 04:09 PM
640 एकर वनजमिनीवर वाद! टोरंट प्रकल्पामुळे आदिवासींच्या उदरनिर्वाहावर संकट? पाली भागातील आदिवासी संतप्त

640 एकर वनजमिनीवर वाद! टोरंट प्रकल्पामुळे आदिवासींच्या उदरनिर्वाहावर संकट? पाली भागातील आदिवासी संतप्त

Follow Us
Follow Us:
  • टोरंट वाल्यांनी जंगल जाळलं
  • आमचे उदरनिर्वाहाचे साधन हरपले
  • पाली भागातील आदिवासी संतप्त
कर्जत : कर्जत तालुक्याच्या पाली भागातील साई डोंगर मध्ये टोरंट वीज कंपनी जलविद्युत प्रकल्प उभारणार आहे.या प्रकल्पासाठी केंद्र सरकार ने खासगी कंपनी म्हणून टोरंट पॉवर एनर्जी स्टोरेज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला परवानगी दिली आहे.मात्र या कंपनीने आदिवासी लोकांचा रोजगार हिरवण्याचा प्रयत्न केला आहे. जंगलातून रानमेवा,कंदमुळे गोळा करून आपल्या कुटुंबाची उपजीविका करणाऱ्या जंगलाला आग लावली आहे,त्यामुळे या आदिवासी लोकांचा रोजगारच हिरावला आहे.दरम्यान,टोरंट कंपनीकडून आदिवासी लोकांवर उपासमारीची वेळ आणली गेली असून आदिवासी ग्रामस्थ कंपनीच्या भूमिकेमुळे संतप्त झाले आहे.

टोरंट कंपनीला वरिष्ठ पातळीवरून जमीन दिली असल्याचे बोलले जात आहे.पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायत मधील हार आदिवासी वाडी मधील आदिवासी समाजाचे लोकांचा उदरनिर्वाह हा जंगलातील रानमेवा गोळा करून त्याची विक्री आजुबाजूच्या गावात करून होत असतो.दरवर्षी आदिवासी लोक दिवसभर जंगलात पावसाळ्यात रानभाज्या,तर हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात जंगली मेवा गोळा करीत असतात. आदिवासींच्या घरातील एक व्यक्ती या सर्व वस्तू आजुबाजूच्या गावात जाऊन विक्री करतात.त्यातून मिळणाऱ्या पैशातून अनेक आदिवासींची घरे चालतात.

APJ Abdul Kalam : भारतरत्न कलामांचा अनोखा खजिना पुण्यात; ‘या’ ठिकाणी आहे ५०० दुर्मीळ फोटोंचा संग्रह

मात्र यावर्षी यासर्व आदिवासी लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन टोरंट पॉवर एनर्जी स्टोरेज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ने हिरावून घेतले आहे.या कंपनीच्या वीज प्रकल्पासाठी सरकारने आपली वन विभागाच्या मालकीची ६४० एकर जमीन देऊन टाकली.या जमिनीत असलेली शंभर दोनशे वर्षापूर्वीची जुनी झाडे यांची संख्या कमी व्हावी म्हणून या जंगलात टोरंट कडून आग लावण्यात आली.त्या आगीमध्ये अनेक झाडे जळुन कोलमडून पडली आहेत तर प्रामुख्याने आदिवासी लोकांचा उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या जांभळी करवंदे यांच्या झाडांना प्रमुख लक्ष्य करण्यात आले.

साई डोंगर मध्ये पूर्वी कधीही वणवे लागले नव्हते असे आदिवासी लोकांचे म्हणणे आहे.जरी कधी वणवा लागला तर आदिवासी लोक तेथे पोहचून लागलेली आग विझवायचे.त्याचे कारण त्या जंगलात असलेला रानमेवा हाच येथील लोकांचा उदरनिर्वाहाचा मुख्य आधार होता.त्यामुळे कधीही आग न लागणाऱ्या पालीच्या साई डोंगर भागात लागलेली आग ही मानवनिर्मित होती आणि ती टोरंट कंपनी कडून लावण्यात आल्याचा येथील स्थानिक आदिवासींचा आरोप आहे.जंगलात एकच वेळी असंख्य ठिकाणी आगीचे लोळ पाहून सर्वत्र हाहाकार माजला होता.

नंतर आदिवासी लोकांनी जंगलात जाऊन पाहिले तर मोठ्या झाडांबरोबर मोठ्या प्रमाणात करवंदे यांच्या सर्व जाळ्या आगीत नष्ट झाल्या आहेत.आंब्याच्या झाडांना आगीचे चटके बसल्याने झाडावर असलेले लहान लहान कैरी गळून पडल्या आहेत.तर जंगलात उन्हाळ्यात मिळणारी फळे देखील टोरंट कंपनी कडून लावण्यात आलेल्या आगीमध्ये जळून गेल्याने आता या आदिवासी लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

Mira Bhayandar: ई-फार्मसीच्या वाढत्या विक्रीविरोधात मीरा-भाईंदरमध्ये औषध विक्रेत्यांचे आंदोलन; एक दिवसाचा बंद ठेवून निषेध

Web Title: Tribal anger against torrent company over hydropower project karjat pali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 04:09 PM

Topics:  

  • karjat news
  • maharashtra
  • raigad

संबंधित बातम्या

Mumbai Heatwave : ऑक्टोबर हिटच्या झळा, उद्या बसणार मुंबईकरांना उष्णतेचा तडाखा, यलो अलर्ट जारी
1

Mumbai Heatwave : ऑक्टोबर हिटच्या झळा, उद्या बसणार मुंबईकरांना उष्णतेचा तडाखा, यलो अलर्ट जारी

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
2

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान
3

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक
4

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.