Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: देवकुंड धबधब्यावर मोठी दुर्घटना; प्रवेशबंदी झुगारून गेलेले दोन पर्यटक पाण्यात बुडाले, शोधमोहीम सुरू

Devkund Waterfall: रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध देवकुंड धबधब्यावर प्रवेशबंदी असतानाही चोरवाटेने गेलेल्या पर्यटकांवर मोठे संकट ओढवले आहे. दोन तरुण पाण्यात बुडाल्यानंतर बचाव पथकाकडून शोधमोहीम सुरू असून प्रशासनाने पर्यटकांना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 13, 2026 | 08:41 AM
Raigad News: देवकुंड धबधब्यावर मोठी दुर्घटना; प्रवेशबंदी झुगारून गेलेले दोन पर्यटक पाण्यात बुडाले, शोधमोहीम सुरू

Raigad News: देवकुंड धबधब्यावर मोठी दुर्घटना; प्रवेशबंदी झुगारून गेलेले दोन पर्यटक पाण्यात बुडाले, शोधमोहीम सुरू

Follow Us
Follow Us:
  • प्रवेशबंदी असतानाही चोरवाटेने देवकुंड धबधब्याकडे गेलेल्या दोन पर्यटकांचा पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची घटना घडली.
  • अंधार आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे शोधमोहीम थांबवण्यात आली असून सोमवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
  • या घटनेनंतर प्रशासनाने पर्यटकांना नियमांचे पालन करून धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
माणगाव: रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध देवकुंड धबधब्यावर प्रशासनाने लागू केलेली प्रवेशबंदी झुगारून चोरवाटेने धबधब्याकडे गेलेल्या पर्यटकांवर काळाने घाला घातला. पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसी परिसरातील विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या २६ जणांच्या गटातील दोन तरुण रविवारी दुपारी पाण्यात बुडाले. सायंकाळपर्यंत त्यांचा शोध लागला नसल्याने अंधारामुळे शोधमोहीम स्थगित करण्यात आली असून सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे.

Dombivli News: शास्त्रीनगर रुग्णालय पुन्हा वादात; उपचाराऐवजी चिमुकल्याला सायन रुग्णालयात हलवण्याचा दिला सल्ला, व्हिडिओ व्हायरल

नेमकं काय घडलं?

माहितीनुसार, चाकण एमआयडीसीतील विविध कंपन्यांमध्ये कार्यरत असलेले २० तरुण आणि ६ तरुणी भाड्याने घेतलेल्या मिनी बसमधून देवकुंड धबधबा पाहण्यासाठी आले होते. दुपारी सुमारे १२.१५ वाजता हा गट पाटणूस टी-पॉईंट येथे पोहोचला. तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी देवकुंड परिसरात प्रवेशबंदी असल्याचे सांगून त्यांना परत पाठविले.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

मात्र, पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून या गटाने स्थानिक गाईडची मदत घेत म्हसेवाडी येथील चोरवाटेने देवकुंड परिसरात प्रवेश केला. दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास गटातील गोपाळ रामलाल राठोड (रा. दामला तांडा, ता. मुखेड, जि. नांदेड) आणि विष्णू विलास ढोक (रा. जयपूर, ता. सेनगाव, जि. हिंगोली) हे दोघे पाण्यात उतरले. विष्णू ढोक याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी गोपाळ राठोड पुढे गेला. मात्र, बुडणाऱ्या विष्णूने गोपाळला मिठी मारल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, दोघेही खोल पाण्यात बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन, स्थानिक बचाव पथक आणि अनुभवी बुडे घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळपर्यंत दोघांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, अंधार आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे शोधमोहीम थांबविण्यात आली. सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Matheran News: वीकेंडला माथेरान हाऊसफुल; घाटरस्त्यावर वाहतूक कोंडी, प्रवेशद्वारावर लांबच लांब रांगा; पर्यटकांची दमछाक

प्रशासनाने नागरिकांना केलं आवाहन

या घटनेमुळे पावसाळ्यात देवकुंड परिसरात लागू करण्यात आलेल्या प्रवेशबंदीचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. प्रशासन आणि पोलिसांनी स्पष्ट मनाई करूनही पर्यटक चोरवाटांचा वापर करून धोकादायक ठिकाणी जात असल्याने अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होत आहे. त्यामुळे पर्यटकांनी नियमांचे पालन करून स्वतःच्या जीवाशी खेळ करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे

Web Title: Two tourists drown at devkund waterfall after ignoring entry ban search operation underway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 08:41 AM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

नेपाळच्या पूरस्थितीने हेलावला ‘टॉक्सिक’चा गायक, घेतला मोठा निर्णय, म्हणाला- “मी लवकरच…”
1

नेपाळच्या पूरस्थितीने हेलावला ‘टॉक्सिक’चा गायक, घेतला मोठा निर्णय, म्हणाला- “मी लवकरच…”

Jai Jai Swami Samarth Special Episode: रक्षाबंधनानिमित्त पाहायला मिळणार स्वामींच्या कृपेची अनोखी कथा!
2

Jai Jai Swami Samarth Special Episode: रक्षाबंधनानिमित्त पाहायला मिळणार स्वामींच्या कृपेची अनोखी कथा!

Lonavala Tourism News :  वीकेंडलाही लोणावळा ओस! पावसाच्या दांडीमुळे भुशी डॅम, धबधबे कोरडे
3

Lonavala Tourism News : वीकेंडलाही लोणावळा ओस! पावसाच्या दांडीमुळे भुशी डॅम, धबधबे कोरडे

Chandrapur News: घोडाझरी धरणाच्या जलसाठ्यात वाढ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दमदार पावसाची प्रतीक्षा कायम
4

Chandrapur News: घोडाझरी धरणाच्या जलसाठ्यात वाढ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दमदार पावसाची प्रतीक्षा कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.